Sonali Bendre and Pakistani Cricketer Shahid Afridi: झगमगत्या विश्वात कायम सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली असते. आता सोशल मीडियामुळे सेलिब्रिटींना त्यांच्या खास व्यक्तीसोबत स्पॉट केलं जातं. पण पूर्वी सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहिती नसायचं. दरम्यान, 90 च्या दशकातील एक काळ असा देखील होता जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी सर्वत्र जोर धरला होता. पण दोघांनी देखील त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अधिकृत घोषणा केली नाही.
आता अनेक वर्षांनंतर नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोनाली बेंद्रे हिच्यासोबत असलेल्या नात्यावर शाहिद याने मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहिद याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. आर्ट्स काउंसिल कराचीसोबत झालेल्या मुलाखतीत क्रिकेटरने मोठं वक्तव्य केलं आहे.
मुलाखतीत शाहिद याला विचारण्यात आलं की, ‘आम्ही असं ऐकलं आहे की, सोनाली बेंद्रेला तू फार आवडायचा… यामध्ये काही तथ्य आहे, की तुमच्यात फक्त मैत्री होती…’ यावर आफ्रिदी याने लक्षवेधी उत्तर दिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहिद यांने दिलेल्या उत्तराची चर्चा रंगली आहे.
पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी म्हणाला, ‘तुम्ही मला आता मला आजोबा म्हणालात आणि आजोबांबद्दल चर्चा करत आहात… ते सर्वकाही आता डिलीट करा… आता आपण मोठे झालो आहोत…’ असं म्हणत क्रिकेटरने सोनाली सोबत असलेल्या नात्यावर बोलणं टाळलं…
सांगायचं झालं तर, 90 च्या दशकात बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्सच्या रिलेशनशिपच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या. पण सोनाली आणि शाहिद यांनी कधीच दोघांच्या नात्यावर मौन सोडलं नाही. आता दोघे देखील त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत.
सोनाली हिने निर्माता गोल्डी बहल याच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. अभिनेत्री कायम पती आणि मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता सोनाली बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
शाहिद आफ्रिदी याच्याबद्दल सांगायचं झालं तर, क्रिकेटरने नादिया आफ्रिदी हिच्यासोबत लग्न केलं. दोघांना चार मुलं देखील आहेत. शाहिद सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहिद त्यााच्या खासगी आयुष्याबद्दल देखील चाहत्यांना सांगत असतो.