सनी लिओनीला हैदराबादमध्ये परफॉर्म करण्यास बंदी, रात्री 1 वाजेपर्यंत पोलीस तैनात, कारण…

| Updated on: Dec 03, 2024 | 9:17 AM

Sunny Leone Event In Hyderabad: सनी लिओन हिचा परफॉर्मन्स पाहाण्यासाठी लोटली होती चाहत्यांची गर्दी, पण अभिनेत्रीच्या परफॉर्मन्सवर बंदी, रात्री 1 वाजेपर्यंत पोलीस 'त्या' ठिकाणी का होते तैनात? सध्या सर्वत्र सनी लियोनी हिची चर्चा...

सनी लिओनीला हैदराबादमध्ये परफॉर्म करण्यास बंदी, रात्री 1 वाजेपर्यंत पोलीस तैनात, कारण...
Follow us on

Sunny Leone Event In Hyderabad: अभिनेत्री सनी लिओनी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सनी हिला पाहिल्यानंतर तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण हैदराबाद याठिकाणी सनीच्या परफॉर्मन्ससाठी नकार देण्यात आला. सनी हिला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती. पण ऐन वेळी चाहत्यांची निराशा झाली. शेवटच्या क्षणी सनी हिचा परफॉर्मन्स कॅन्सल करण्यात आला. आयोजकांनी सनीची प्रकृती ठिक नसल्याचं कारण दिलं. पण नंतर कळलं की आयोजकांनी सनीच्या परफॉर्मन्ससाठी परवानगी घेतली नव्हती. असं असताना देखील आयोजकांनी कार्यक्रम सुरु ठेवला.

सनी लिओनी हैदराबादच्या जुबली हिल्स येथील इल्युजन पबमध्ये डीजे नाईटमध्ये परफॉर्म करणार होती. सनी परफॉम करणार होती म्हणून चाहत्यांची गर्दी देखील जमली होती. सर्वांनी तिकिट देखील खरेदी केले होते. डीजे नाईटची वेळ रात्री 11 ते 12.30 पर्यंत होती. डीजे नाईटमध्ये जवळपास 500 पेक्षा अधिक लोकं होती. मात्र शो होऊ नये म्हणून 8 वाजल्यापासून पबबाहेर 100 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

 

 

पबबाहेर पोलीस तैनात असल्याचं चित्र दिसताच फॅन्स निराश झाले. परिस्थिती सांभाळण्यासाठी आयोजकांकडून पबच्या स्क्रीनवर एक व्हिडिओ दाखवण्यात आला. ज्यामध्ये सनी लिओनीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ती परफॉर्म करू शकणार नाही, पण बॉलीवूडच्या थीमनुसार क्लब सुरू राहील, असं सांगण्यात आलं होतं. अखेर त्यांनी आलेल्या सर्व लोकांची माफी देखील मागितली. आयोजकांनी घोषणा केल्यानंतर अनेक लोकं निघून देखील गेली.

आयोजकांनी घेतली नव्हती परमिशन

मिळालेल्या माहितीनुसार, सनी लिओनी हिच्या परफॉर्मन्ससाठी आयोजकांना परवानगी मिळाली नव्हती. पण तरी देखील योजनेनुसार त्यांनी कार्यक्रम सुरु ठेवला. सनी लोओनी परफॉर्म करणार म्हणून लोकांनी बुकींग देखील केली होती. कार्यक्रम सुरु झाला की परिस्थिती नियंत्रणात येईल असं आयोजकांना वाटलं. पण असं काहीही झालं नाही. सनीच्या परफॉर्मन्ससाठी नकार देण्यात आला आणि रात्री 1 वाजेपर्यंत पोलीस पबबाहेर तैनात होते.