मुंबई : सनी लिओनी हे एक नाव कायमच चर्चेत असते. सनी लिओनी हिची भारतामध्ये जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सनी लिओनी हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये एक हिट बाॅलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. भारतामध्ये तिने आपल्या करिअरची सुरूवात ही बिग बाॅसपासून केलीये. बिग बाॅसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना सनी लिओनी दिसली. विशेष म्हणजे सनी लिओनी हिचे नशीब बिग बाॅसच्या घरात असतानाच उजळले. सनी लिओनी हिला बिग बाॅसच्या घरात असतानाच पहिल्या बाॅलिवूड चित्रपटाची आॅफर आली.
सनी लिओनी हिला महेश भट्ट यांनी त्यांच्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली. तेंव्हापासून सनी लिओनी हिने मागे वळून बघितले नाही. नुकताच सनी लिओनी हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना सनी लिओनी ही दिसली आहे. लोक तिला कशाप्रकारचे टोमणे हे मारतात हे सांगताना सनी लिओनी ही दिसली.
सनी लिओनी ही म्हणाली की, लोक माझ्या वयामुळे मला कायमच टोमणे मारायचे. पुढे सनी म्हणाली, मला कधीच मोठ्या रोलची अपेक्षा नसते, मला छोटे रोल परंतू महत्वाचे करायला आवडतात. सनी लिओनी म्हणाली, कायमच महिलांना टाइपकास्ट केले जाते. एका प्रकारे हा भागच झालाय. तुम्ही कोणत्याही वयामध्ये सक्सेस मिळू शकता.
तुम्ही कधीही तुमचे करिअर सुरू करू शकता. कोणत्याही ठरावीक वयाची गरज अजिबातच नाहीये. हे सर्वकाही तुमच्यावर आधारित आहे. कोणत्याही गोष्टीचा टाईम आणि वय ठरलेले नसते. या सर्व गोष्टी साधारण 15 ते 20 वर्षांपूर्वी असायच्या. लोक बोलायचे वय झाले आहे, आता काम नाही केले पाहिजे. मुळात म्हणजे या सर्व जुन्या गोष्टी आहेत.
अनेक लोकांनी आपल्या करिअरमध्ये ब्रेक घेतले होते आणि आता ते परत वापस येत आहेत. बरेच चांगले शो करत आहेत. सनी ही एक पाॅर्न स्टार अगोदर होती. मात्र, आता सनी लिओनी हिने स्वत: ची एक वेगळी आणि खास ओळख मिळवली आहे. सनी लिओनी ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.