कंगना राणावत ही सध्या चांगलीच चर्चेत आलीये. बॉलिवूडनंतर आता थेट राजकारणात कंगना राणावत उतरली आहे. कंगना राणावत हिने मंडीमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि मोठ्या लीडने ती निवडणूक जिंकली. कंगना राणावत हिने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. कंगना राणावतची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. कंगना राणावत सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते.
कंगना राणावत हिच्यासोबत चंदीगड विमानतळावर हैराण करणारा प्रकार घडला. विमानतळावर सीआयएसएफ गार्ड महिलेने कंगना राणावत हिच्या कानाखाली मारली. त्यानंतर एकच खळबळ बघायला मिळाली. या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. यानंतर कंगना राणावत हिने पोस्ट शेअर करत आपण सुरक्षित असल्याचे म्हटले.
आता कंगनासोबत घडलेल्या या प्रकारावर स्वरा भास्कर हिने मोठे विधान केले आहे. स्वरा भास्कर हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. स्वरा भास्कर म्हणाली की, कोणताही समजदार माणूस हेच म्हणेल की कंगनासोबत जे घडले ते चुकीचे होते. मला वाटते की हिंसाचाराचे समर्थन कोणीही करणार नाही. कंगनासोबत जे घडले ते चुकीचे होते आणि ते घडायला नको होते.
मुळात म्हणजे कोणालाही मारणे योग्य नाहीच. कंगनाच्या फक्त कानाखाली मारण्यात आली (कोणीही कानाखाली मारू नये). तिचा जीव सुरक्षित आहे ना? कंगनालाही सुरक्षा आहे. या देशात लोकांना जीव गमवावा लागला आहे. लोकांना बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ट्रेनमध्ये गोळ्या घातल्या आहेत.
दंगलीदरम्यान सुरक्षा कर्मचारी लोकांना मारहाण करत असल्याचे देखील रेकॉर्ड झाले आहे, असेही स्वरा भास्कर हिने म्हटले आहे. आता स्वरा भास्करच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. स्वरा भास्कर हिने 2023 मध्ये फहाद अहमद याच्यासोबत लग्न केले. काही दिवसांपूर्वीच स्वरा भास्कर हिने मुलीला जन्म दिला. स्वरा सध्या सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे.