Tabu Love story : हिंदी चित्रपटसृष्टीत 90च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री तब्बू (bollywood actress tabu) आजही फार लोकप्रिय आहे. मोठ्या पड्यावर फार कमी सक्रिय असणारी तब्बू चाहत्यांच्या मनात मात्र आजही कायम आहे. तब्बू कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आली. एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडवर तब्बूचं राज्य होतं. पण आज सर्वकाही असूनही तब्बू एकटी आहे. तब्बूला कधी तिच्या आयुष्यातील खरं प्रेम भेटलंच नाही. तब्बू आणि दाक्षिणात्य अभिनेता अक्किनेनी नागार्जुन (Akkineni Nagarjuna) यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली. पण तब्बू आणि अक्किनेनी नागार्जुन यांचं नातं फार काळ टिकलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्किनेनी नागार्जुन आणि तब्बू याचं तब्बल १० वर्षांनंतर ब्रेकअप झालं. १० वर्षांनंतर दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. पण आजही अक्किनेनी नागार्जुन आणि तब्बू चांगले मित्र आहेत. खुद्द तब्बू हिने दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये अक्किनेनी नागार्जुन याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मौन सोडलं. (Akkineni Nagarjuna – tabu)
२००७ साली करण याने तब्बूला अक्किनेनी नागार्जुन याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल विचारलं. तेव्हा तब्बून देखील अक्किनेनी नागार्जुन सोबत असलेल्या नात्यावर मौन सोडलं. अभिनेत्री म्हणाली, ‘आयुष्यात बॉयफ्रेंड येतात जातात, पण माझ्या आयुष्यात अक्किनेनी नागार्जुन कायम राहील.’ (tabu incompleted love story)
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘अक्किनेनी नागार्जुन माझ्या आयुष्यातील खास व्यक्तींपैकी एक आहे. तो कायम माझ्या मनात राहिल. या जगात कोणतंच नातं आम्हाला वेगळं करु शकत नाही. अक्किनेनी नागार्जुन याच्यासोबत असलेल्या नात्याला लावयला माझ्याकडे कोणतंही लेबल नाही. आमच्यातील मैत्री कोणतंही दुसरं नातं तोडू शकत नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. (Akkineni Nagarjuna love story)
अक्किनेनी नागार्जुन आणि तब्बू यांची ओळख अभिनेत्री १६ आणि अभिनेता २२ वर्षांचा असताना झाली होती. आज अक्किनेनी नागार्जुन त्याच्या आयुष्यात फार पुढे गेला आहे. तब्बू मात्र आजही एकटं आयुष्य जगते. आज तब्बू आणि अक्किनेनी नागार्जुन यांच्या नात्याला अनेक वर्ष झाली पण त्यांच्या नात्याची चर्चा कायम रंगलेली असते. (tabu love story)