मुंबई : ‘सर’ आणि ‘मान्सून वेडिंग’ सारख्या (Sir and Mansoon Wedding) चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली सुंदर अभिनेत्री तिलोत्तमा शोमने (tillotama shome) सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती सूर्यप्रकाशाचा आनंद लुटताना दिसत आहे. पण हा फोटो नेहमीपेक्षा जरासा वेगळा आहे. काखेतील केस (unshaved armpit) दाखवतानाचा फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केलाय. तिने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला असून त्यावर ‘अन-अपोलोजेटिक’ असे लिहिले आहे. काखेतील न केस काढलेले कॅमेऱ्यात दिसत आहेत. तिच्या याच फोटोवर नेटकरी उलट सुलट प्रतिक्रिया देत आहेत. कुणी तिच्या बिनधास्तपणाची स्तुती करतंय, तर कुणी ‘बिनकामाचा बिनधास्तपणा’ म्हणत तिच्यावर शेरेबाजी करतंय. पण या सगळ्यानंतर मी टाकलेल्या फोटोबद्दल माफी मागणार नसल्याचंही तिलोत्तमाने ठासून सांगितलं आहे.
फोटोत तिलोत्तमाच्या चेहऱ्यावर मोठं हसू आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिलंय, “शरीरावर असलेल्या केसांबद्दल मी माफी मागणार नाही. मला ते आवडतात म्हणून ते मी ठेवले आहे. मी वॅक्स करते आणि नाही सुद्धा”
तिलोत्तमाच्या फोटो पोस्टचं अनेकांनी कौतुक केलंय, तर काही लोक मात्र संतापले आहेत. एका महिलेने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, “माफ कर पण हा फोटो फारच विचित्र आहे. तिलोत्तमाने त्याला उत्तर दिले, “स्वतः चांगले व्हा आणि इतरांना होऊ द्या. तुमचा दिवस चांगला जावो.” दुसऱ्या एका युजर्सने तिलोमत्ताने सुनावलं आहे. ‘काखेतील केस काढायला काय प्रोब्लेम आहे. की उगीचच कशाचा पण इश्श्यू करायचा?’, अशा शब्दात एक युजर्स तिच्यावर भडकली आहे.
तिलोत्तमाने मीरा नायरच्या मान्सून वेडिंगमध्ये विजय राज यांच्याबरोबर अॅलिसची भूमिका साकारली होती. तिला सर मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (समीक्षक) फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. गेल्या वर्षी एका मुलाखतीत तिलोत्तमाने इंडस्ट्रीसमोरील विविध आव्हानांबद्दल सांगितलं होतं.
तिलोत्तमा नेटफ्लिक्सवरील सर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. याच चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. तिलोतमाने मॉन्सून वेडिंग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय.
संबंधित बातम्या