मुंबई | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी, अभिनेत्रीच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगलेल्या असतात. एवढंच नाही तर, एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्रीच्या सौंदर्यावर आणि तिच्या घायाळ अदांवर फक्त चाहतेच नाही तर, अनेक सेलिब्रिटी देखील घायाळ होते. सिनेमात उर्मिला मुख्य भूमिकेत असाव्या म्हणून अनेक दिग्दर्शकांनी अन्य अभिनेत्रींना बाहेरचा रस्ता दाखवला. अभिनेत्रीच्या सौंदर्याची जादू प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्यावर इतकी चढली होती, की उर्मिला यांना प्रत्येक सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत घेण्यासाठी रामगोपाल वर्मा प्रयत्न करायचे.
‘द्रोही’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान राम गोपाल वर्मा यांनी अभिनेत्री आणि त्यांचा डान्सला पाहिलं. त्यानंतर रामगोपाल वर्मा यांचा जीव अभिनेत्रीवर जडला. अखेर ‘रंगीला’ सिनेमासाठी दिग्दर्शकाने उर्मिला यांची निवड केली. रामगोपाल वर्मा यांनी त्यांच्या अनेक सिनेमांमध्ये उर्मिला यांना संधी दिल्या. तेव्हा अन्य दिग्दर्शकांसोबत काम साकारण्यास अभिनेत्री सतत नकार देत होती…
अखेर रामगोपाल वर्मा आणि उर्मिला मातोंडकर यांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगू लागल्या. अशात उर्मिला यांच्यासाठी जेव्हा रामगोपाल वर्मा यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला तेव्हा उर्मिला आणि रामगोपाल वर्मा यांच्या नात्याच्या चर्चांनी सर्वत्र जोर धरला होता.
उर्मिला आणि रामगोपाल वर्मा यांच्या नात्याबद्दल दिग्दर्शकाच्या पत्नीला देखील कळालं. तेव्हा रामगोपाल वर्मा यांच्या पत्नीने उर्मिला हिच्या कानशिलात लगावली आणि रामगोपाल वर्मा यांना घटस्फोट दिला. त्यानंतर रामगोपल वर्मा आणि उर्मिला यांच्या नात्याला देखील तडा गेली.
आज उर्मिला मातोंडकर बॉलिवूडपासून दूर असल्यातरी त्याच्या अभिनयाची आणि डान्सची चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगलेली असते. आज देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. सोशल मीडियावर देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी उर्मिला मातोंडकर सोशल मीडियाची मदत घेतात. त्यांची प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल होते.
बॉलिवूडला रामराम ठोकल्यानंतर उर्मिला यांनी वयाच्या ४२ व्या वर्षी लग्न केलं. अभिनेत्रीने स्वतःपेक्षा १० वर्ष लहान मोहसिन अख्तर मीर यांच्यासोबत लग्न केलं. मोहसिन एक कश्मिरी मॉडेल आणि उद्योजक आहे. अभिनेत्रीचे पतीसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असता