अभिनेत्री उर्वशी रौतेला हे कायमचच चर्चेत असणारे नाव आहे. फक्त अभिनयच नाही तर उर्वशी रौतेला ही तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय उर्वशी रौतेला दिसते. उर्वशीचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना उर्वशी रौतेला दिसते. उर्वशी रौतेला हिने काही दिवसांपूर्वीच 24 कॅरेट सोन्याचा ड्रेस घातला. या ड्रेसमधील उर्वशी रौतेलाचे फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. वाढदिवसाला देखील उर्वशी रौतेलाने सोन्यापासून तयार केलेला केक कट केला होता.
नुकताच उर्वशी रौतेला हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्येही काही मोठे खुलासे करताना उर्वशी रौतेला ही दिसली. आता थेट डेटिंग ॲपबद्दल बोलताना उर्वशी रौतेला ही दिसली आहे. मध्यंतरी चर्चा रंगताना दिसली की, डेटिंग ॲप रायावर अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर आणि हृतिक रोशन यांचे प्रोफाईल आहे. आता त्याबद्दल उर्वशी रौतेलाने भाष्य केले.
उर्वशी रौतेला म्हणाली की, होय मी डेटिंग ॲप रायावर आहे. मी फक्त आणि फक्त माझ्या मित्रांसाठी त्या ॲपवर आहे बाकी दुसरा कोणताही माझा उद्देश नाहीये. मीच काय तर ऋतिक हा देखील रायावर आहे. मी या ॲपवर आदित्य रॉय कपूरलाही पाहिले आहे. अनेक मोठे कलाकार देखील या डेटिंग ॲपवर आहेत.
या डेटिंग ॲपबद्दल अनेक मोठे खुलासे करताना देखील उर्वशी रौतेला ही दिसली. मलायका अरोरा हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यापासून अर्जुन कपूर हा डेटिंग ॲपवर सक्रिय झाल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्याही ब्रेकअपच्या सतत चर्चा या सुरू आहेत आणि त्यामध्ये आता डेटिंग ॲपवर आदित्यचे देखील प्रोफाईल दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपच्या चर्चा या रंगताना दिसत आहेत. मात्र, आपल्या ब्रेकअपवर त्यांनी काहीच भाष्य केले नाही. फक्त हेच नाही तर मलायकाच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर अर्जुन कपूर हा मलायकासोबतच दिसला. अनन्या पांडे आणि आदित्य यांनीही त्यांच्या ब्रेकअपवर भाष्य केले नाहीये.