बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्या आयुष्यात फक्त एकदा नाहीतर, अनेकदा प्रेमाची एन्ट्री झाली. पण तरी देखील त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही. तुम्ही बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रीला ओळखती जिने एका पाठोपाठ अनेक सिनेमांमध्ये काम केलं, पण अभिनेत्री तिच्या रिपेशनशिपमुळे अधिक चर्चेत राहिली. आज देखील अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अभिनेत्री बॉलिवूड अभिनेते, उद्योजक मॉडेल… झगमगत्या विश्वातील अनेक सेलिब्रिटींना डेट केलं आहे. अभिनेत्रीच्या आयुष्यात प्रेमाची एक – दोन वेळा नाही तर, चक्क 11 वेळा एन्ट्री झाली. पण अभिनेत्रीने कोणासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही. पण लग्नाआधी आई झाल्यामुळे अभिनेत्रीला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला…
असं म्हणतात एका आईसाठी तिच्या मुलांपेक्षा अधिक महत्त्वाचं अधिक काहीही नसतं… सध्या चर्चेत असलेल्या अभिनेत्रीसोबत देखील असंच काही झालं आहे. अभिनेत्रीने अभिनेता सलमान खान, शाहरुख खान यांसारख्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांसोबत काम केलं. पण आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं स्वतःच्या करियरकडे दुर्लक्ष झालं. पण जेव्हा तिने पुन्हा अभिनय विश्वात पदार्पण केलं तेव्हा अनेक अव्वल अभिनेत्रींना मागे टाकलं….
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सुष्मिता सेन आहे. सुष्मिता हिने अनेक सिनेमांमध्ये महत्तावाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिनेत्री अफेअरमुळे अधिक चर्चेत राहिली. ललित मोदी, संजय नारंग, रणदीप हुडा, इम्तियाज खत्री, वसीम अकरम आणि मुदस्सर अजीज यांसारख्या 11 जणांना अभिनेत्रीने डेट केलं आहे. रोहमन शॉल सध्या अभिनेत्री रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे…
आज देखील सुष्मिता हिने लग्न का नाही केलं? असा प्रश्न चाहते विचारत असतात. आज सुष्मिता तिच्या यशाच्या उच्च शिखरावर आहे. पण एक काळ असा होता जेव्हा मुलीसाठी अभिनेत्रीला करियरकडे दुर्लक्ष करावं लागलं. सुष्मिता हिने लग्न केलेलं नाही. पण अभिनेत्री दोन मुलींची आई आहे.
एका मुलाखतीत सुष्मिता म्हणाली होती, ‘मला सिनेमाची शुटिंग मध्येच सोडवी लागली. कारण माझ्या मोठ्या मुलीची प्रकृती गंभीर होती…’ अभिनेत्रीची मोठी मुलगी रिनी हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा सुष्मिता हिला अनेकांनी सांगितलं होतं की… तुझं करियरकडे दुर्लक्ष होत आहे… कारण बॉलिवूडमध्ये काम करत असताना वयाच्या 24 व्या वर्षी सुष्मिता हिने आई होण्याचा निर्णय घेतला… सुष्मिता हिने दोन मुलींना दत्तक घेतलं आहे.
सुष्मिता हिला सध्या मॉडेल रोहमन शॉल याच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून सतत स्पॉट करण्यात येत आहे. अनेकदा अभिनेत्री रोहमन शॉल आणि दोन मुलींसोबत फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने वयाच्या 47 व्या वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे, ‘ताली’ आणि ‘आर्य’ सीरिजमुळे सुष्मिता हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये वाढ झाली…