ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या रायने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. एका मागून एक चित्रपट ऐश्वर्या राय हिचे प्रेक्षकांच्या भेटीला येतात. ऐश्वर्या राय ही बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे. ऐश्वर्या राय हिने 2007 मध्ये अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची एक मुलगी असून तिचे नाव आराध्या आहे. आराध्या कायमच आई वडिलांसोबत स्पॉट होताना दिसते.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचे लग्न राधिका मर्चंट हिच्यासोबत झाले. हे लग्न मुंबई येथे झाले. या लग्नाला फक्त देशातूनच नाहीतर विदेशातूनही लोक मोठ्या संख्येने दाखल झाले. बॉलिवूड कलाकार या लग्नात धमाल करताना दिसले. आता या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
या लग्नामध्ये ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या हिच्यासोबत पोहोचली. यावेळी ऐश्वर्या राय ही जबरदस्त लूकमध्ये पोहोचली होती. मात्र, ऐश्वर्या राय हिच्या लूकपेक्षाही ऐश्वर्याची मुलगी आराध्या हिच्या लूकची चर्चा अधिक रंगताना दिसली. आराध्याचा लूक लोकांना जास्त आवडल्याचे बघायला मिळतयं.
आराध्या हिने केस कट केल्याचे दिसत आहे. यासोबतच जुनी हेअरस्टाईलही बदलली आहे. लोक आराध्या हिचे काैतुक करताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, आई ऐश्वर्या राय हिच्यापेक्षाही अधिक सुंदर आराध्या दिसत आहे. मला आराध्याचा लूक आवडलाय. आराध्या ही ऐश्वर्या हिच्यापेक्षाही अधिक सुंदर दिसत असल्याचे अनेकांचे म्हणणे आले. काही दिवसांपूर्वीच आईसोबत विदेशात जाताना आराध्या बच्चन ही दिसली होती.
ऐश्वर्या राय हिच्या हाताला दुखापत झाल्यानंतर तिची काळजी घेताना आराध्या बच्चन ही दिसली. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये वाद सुरू असल्याचे सांगितले जातंय. हेच नाहीतर लवकरच दोघांचा घटस्फोट होणार असल्याचीही चर्चा आहे. अंबानींच्या पार्टीमध्येही ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबासोबत सहभागी झाली नव्हती. ती मुलगी आराध्या हिच्यासोबतच दिसली.