अभिनेत्री ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. ऐश्वर्या राय ही तिच्या चित्रपटांमुळे नव्हेतर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चन याच्यासोबत 2007 मध्ये लग्न केले. अभिषेकसोबत लग्न करण्याच्या अगोदर तिने काही वर्षे अभिनेता सलमान खान याला डेट केले. हेच नाहीतर सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचेच लग्न होणार असल्याचे सांगितले जात असे. मात्र, यांचे अचानक ब्रेकअप झाले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची एक मुलगी असून तिचे नाव आराध्या बच्चन आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात ऐश्वर्या राय ही पोहोचली.
गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. त्यामध्येच आता ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबियांसोबत नाहीतर चक्क मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबतच अनंत अंबानीच्या लग्नात पोहोचली. यामुळे आता परत एकदा ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाची तूफान चर्चा सुरू आहे.
आता सोशल मीडियावर काही फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये वाद सुरू असतानाच जया बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे काही जुने फोटो हे व्हायरल होत आहेत. सार्वजनिक ठिकाणी ऐश्वर्या राय हिच्यावर जया बच्चन या रागावल्या असल्याचे त्या फोटोंवरून दिसत आहे.
एका फोटोमध्ये ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, जया बच्चन आणि अमिताभ बच्चन हे दिसत आहेत. सर्वजण चेहऱ्यावर स्माईल देताना दिसत आहेत फक्त जया बच्चन याच या फोटोमध्ये रागाने बघताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्या राय ही जया बच्चन यांच्या मागे चालत आहे आणि जया बच्चन रागाने पुढे निघून जाताना दिसत आहेत.
एका फोटोमध्ये तर ऐश्वर्या राय ही जया बच्चन यांना काहीतरी बोलताना दिसत आहे. मात्र, ऐश्वर्या राय हिचे न ऐकताच जया बच्चन या निघून जाताना देखील दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे खरोखरच घटस्फोट घेणार आहेत का? किंवा त्यांच्यामध्ये काही वाद सुरू आहे का याबद्दल बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये. ऐश्वर्या राय ही अनंत अंबानीच्या लग्नानंतर मुलगी आराध्या हिच्यासोबत विदेशात गेलीये.