मुंबई | 15 ऑक्टोबर 2023 : सुंदर दिसायला प्रत्येकाला आवडतं. म्हणून महिला अनेक महागड्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. ज्यामुळे सौंदर्य वाढतं, पण त्याचे साईड इफेक्ट देखील होत असतात. महत्त्वाचं म्हणजे, बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे चमकदार स्किन मिळवण्यासाठी महिला आणि तरुणी कायम प्रयत्न कसतात. मुलाखतींमध्ये अभिनेत्री त्यांच्या सौंदर्याचं रहस्य सांगत असतात. तर आज जाणून घेवू अभिनेत्री नक्की कोणत्या गोष्टींचा वापर करून स्वतःचं सौंदर्य वाढवतात. अत्यंत स्वस्त गोष्टींचा वापर करत अभिनेत्रींच्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढत.. पण आरोग्यासंबंधी कोणतीही गोष्ट करण्याआधी डॉक्टरांच्या सल्ला नक्की घ्यावा. ज्यामुळे आरोग्यास कोणतीही हानी पोहोचत नाही.
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस | जॅकलीन फर्नांडिस तिच्या दिवसाची सुरुवात गव्हाच्या गवताच्या रसाने करते. या डिटॉक्स ड्रिंकमुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. एवढंच नाही तर, ड्रिंकमुळे त्वचा देखील चमकदार होते. अनेक पोषक तत्वांनी समृद्ध, व्हीटग्रासचा शरीरावर होणारा परिणाम थंड असतो. त्यामुळे गव्हाच्या गवताच्या उन्हाळ्यात रोज सेवन करणं फायदेशीर ठरेल. पण ड्रिंकचं मर्यादित प्रमाणातच सेवन करावं. अभिनेत्रीही याची विशेष काळजी घेते.
अभिनेत्री मौनी रॉय | मौनी कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा रंगलेली असते. मौनी रोज सकाळी हळदीचं पाणी पिते. एका ग्लास गरम पाण्यात चिमूटभर हळद मिक्स करून प्यायल्यास त्वचा चमकदार होते. हळदीमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. हळदीचे पाणी पिण्याबरोबरच अभिनेत्री दालचिनीचं पाणी देखील पिते.
अभिनेत्री दीपिका पादुकोण | दीपिका हिच्या सौंदर्यात दिवसागणिक वाढ होत आहे. अभिनेत्री पूर्वीपेक्षा जास्त ग्लॅमरस आणि हॉट दिसते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा रंगलेली असते. अभिनेत्री सकाळी लवकर ताज्या फळांचा रस पितात. एवढेच नाही तर ती तिच्या आहारात जास्तीत जास्त द्रवपदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात, त्यामुळे त्वचा चमकू लागते.
अभिनेत्री मलायका अरोरा | वयाच्या ४९ व्या वर्षी देखील अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्सॅमरस दिसते. मलायका चाहत्यांना देखील फिट राहण्यासाठी आवाहन करत असते. रोज सकाळी अभिनेत्री कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून पिते. ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. एवढंच नाही तर, ड्रिंकमुळे त्वचा देखील चमकदार होते.