नुकताच बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक हैराण करणारी बातमी येत आहे. अभिनेत्री आशा शर्मा यांनी जगाचा निरोप घेतलाय. 88 व्या वर्षी आशा शर्मा यांनी शेवटचा श्वास घेतलाय. या बातमीनंतर आशा शर्मा यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटात त्या महत्वाच्या भूमिकेत दिसल्या. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चित्रपटांसोबत त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले. आशा शर्मा यांनी टीव्ही मालिका ‘कुमकुम भाग्य’मध्येही काम केले.
‘आदिपुरुष’ या चित्रपटातही त्या महत्वाच्या भूमिकेत होत्या. त्यांच्या निधनावर टीव्ही जगतासोबतच चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनीही शोक व्यक्त जातोय. आशा शर्मा यांच्यावर गेल्या एक वर्षांपासून उपचार सुरू असल्याचे सांगितले जातंय. त्यांना अंथरुणावरून उठता देखील येत नव्हते.
#cintaa expresses its condolences on the demise of Asha Sharma #condolence #restinpeace @poonamdhillon @dparasherdp @itsupasanasingh @HemantPandeyJi_ @ImPuneetIssar @rishimukesh @bolbedibol @iyashpalsharma @SahilaChaddha @actormanojjoshi @RealVinduSingh @HetalPa45080733 @ljsdc pic.twitter.com/RihVuk7I5g
— CINTAA_Official (@CintaaOfficial) August 25, 2024
आदिपुरुष चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी आशा शर्मा यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले. ओम राऊत हे म्हणाले की, हे खरोखरच खूप जास्त दुर्दैवी आहे. आशा शर्मा या एक अभिनेत्री आणि व्यक्ती म्हणून खूप जास्त छान होत्या. मला त्यांच्या निधनाबद्दल ऐकून वाईट वाटले.
आशा शर्मा यांनी ओम राऊत यांच्या आदिपुरुष चित्रपटात माता शबरीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अभिनेता प्रभास भगवान रामाच्या भूमिकेत तर अभिनेत्री क्रिती सेनन माता जानकीच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद देखील दिला.