बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आज अमीषा पटेल हिचा वाढदिवस आहे. ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली आहे. एका मुलाखतीत अमीषा हिने अभिनेता संजय दत्त याच्याबद्दल मोठा खुलासा केला होता. गेल्या 20 वर्षांपासून संजय दत्त अभिनेत्रीसाठी एक काम करत आहे. पण आजपर्यंत ते काम पूर्ण झालं नाही. रिपोर्टनुसार, अमीषा पटेल हिच्यासाठी जोडीदार शोधण्याचं काम संजय दत्त करत आहे.
एका मुलाखतीत अमीषा म्हणाली होती, ‘संजू माझ्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहे.संजय मला नेहमी म्हणतो, अमीषा तू या इंडस्ट्रीसाठी खूप चांगली आहेस, मी तुला या इंडस्ट्रीतून बाहेर काढेल. तू खूप साधी आहेस, खूप निरागस आहेस… मी तुझं लग्न करून देईन. अमीषा पुढे म्हणते, तो सर्वांना सांगतो की, जर तुम्हाला अमीषाचे मन जिंकायचे असेल तर तिच्याशी चांगले वागा.’
एवढंच नाहीतर, संजय दत्त याने काही मुलं देखील पाहिली होती. पण अभिनेत्रीने सर्वांना नकार दिला. ‘संजय दत्त याला माझं कन्यादान करायचं आहे. शिवाय माझ्या मुलांसोबत संजूबाबाला खेळायचं देखील आहे…’ पण आयुष्यात आलेल्या अनुभवांनंतर अमीषा हिने लग्न केलं नाही.
वयाच्या 48 व्या वर्षी देखील अभिनेत्री एकटी आहे. पैसा, प्रसिद्धी, संपत्ती सर्वकाही असून देखील अभिनेत्री एकटीच आयुष्य जगते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान रिलेशनशिपबद्दल देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं होतं.
‘माझे दोन रिलेशनशिप होते. त्याच कारणामुळे माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त झाली. याच कारणामुळे 12 – 13 वर्षांपासून माझ्याकडे कोणत्या पुरुषाचं प्रेम नाही… मी आनंदाने जगत आहेत मला आता काहीही नको. चित्रपटसृष्टीत सिंगल राहण्याचा दर्जा कायम ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरते.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली….
अमीषा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.