मलायका अरोरा हिच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. मलायका अरोराच्या वडिलांनी राहत्या घराच्या बाल्कनीतून उडी घेत थेट आत्महत्या केली. या घटनेनंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. हैराण करणारे म्हणजे एक दिवस अगोदरच मलायका अरोरा आणि तिची बहीण आई वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचल्या होत्या. बांद्रामध्ये मलायका अरोराचे आई वडील राहत. 11 सप्टेंबर 2024 हा मलायका अरोरा हिच्यासाठी वाईट दिवस ठरला. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत तिच्या वडिलांनी बाल्कनीतून उडी घेत जीवनयात्रा संपवली.
मलायका अरोरा हिच्या वडिलांच्या निधनाची बातमी कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणात तपास हा सुरू केलाय. मलायका अरोराला भेटण्यासाठी अनेक कलाकार तिच्या आई वडिलांच्या घरी पोहोचले. आता काही वेळात मलायका अरोरा हिच्या वडिलांवर अत्यंसंस्कार केले जाणार आहेत. बॉलिवूडचे अनेक कलाकार पोहोचले आहेत.
मलायका अरोरा ही आपल्या आईसोबत स्मशानभूमीकडे निघाली आहे. यावेळी मलायकाचा लेक देखील आपल्या आईसोबत दिसतोय. स्मशानभूमीकडे अरबाज खान पत्नी शूरा खान हिच्यासोबत पोहोचला आहे. हेच नाही तर करीना कपूर, करिश्मा कपूर आणि सैफ अली खान हे देखील पोहोचले आहेत.
दुसरीकडे सोहेल खान आणि त्याला मुलगा देखील स्मशानभूमीमध्ये दाखल झाले. यासोबत गीता कपूर, रेमो देखील गेले आहेत. आता अनेक फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत. मलायका अरोरा हिच्या वडिलांच्या निधनानंतर तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अर्जुन कपूर मलायकासोबत दिसतोय.
11 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी नऊ वाजता सहाव्या मजल्यावरून उडी घेत मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. ज्यावेळी मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या केली, त्यावेळी घरात फक्त तिची आईच उपस्थित होती. मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या नेमकी का केली, याबद्दल खुलासा होऊ शकला नाहीये.