मलायका अरोरा दररोज सकाळी पिते ‘हे खास पेय, फिटनेसचे रहस्य अखेर..

| Updated on: May 14, 2024 | 1:53 PM

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. हेच नाही तर मलायका अरोरा ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. मलायका अरोरा ही काही दिवसांपूर्वीच अरबाज खान याच्या घरी गेली होती, ज्यानंतर विविध चर्चा रंगताना दिसल्या.

मलायका अरोरा दररोज सकाळी पिते हे खास पेय, फिटनेसचे रहस्य अखेर..
Malaika Arora
Follow us on

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा सोशल मीडियावर सक्रिय देखील असते. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही मलायका अरोरा दिसते. मलायका अरोराचे वय 50 असूनही ती बोल्डनेसमध्ये 25 वयाच्या मुलींना आरामात मागे टाकते. हेच नाही तर आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देताना मलायका अरोरा कायमच दिसते. मलायका अरोरा ही जिमबाहेर देखील कायमच स्पाॅट होताना देखील दिसते.

मलायका अरोरा ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करतंय. हेच नाही तर मध्यंतरी हे दोघे लग्न करणार असल्याचे देखील सांगितले जात होते. मात्र, यावर दोघांपैकी कोणीही भाष्य केले नाही. मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याच्यासोबत कायमच स्पाॅट होताना दिसते.

मलायका अरोरा हिचा डाएट अत्यंत खास असतो. मलायका अरोरा ही आपल्या दिवसाची सुरूवात अत्यंत हेल्दी पेयाने करते. विशेष म्हणजे यामुळे दिवसभर फ्रेश राहण्यास, वजन कमी होण्यास आणि तिची त्वचा चांगली राहण्यास मदत होते. मेथी, जीरा आणि ओव्याचे खास पेय दररोज सकाळी न चुकता मलायका अरोरा ही घेते म्हणजे घेतेच.

मलायका अरोरा हिच्या फिटनेसचे हे मोठे राज आहे. त्यासाठी मलायका अरोरा ही रात्रीच मेथी, जीरा आणि ओवा भिज घालते. सकाळी हे पाण्यात उकळून घेते आणि उपाशी पोटी पिते. हे पाणी पिल्याने फिटनेस वाढण्यास मदत होते. विशेष म्हणजे हे पाणी घेतल्यानंतर काही वेळ काहीही मलायका अरोरा ही खात नाही. न चुकता हे खास पेय मलायका अरोरा घेते.

काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा हिने खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये मलायका अरोरा ही नाश्ता करताना दिसत होती. मलायका अरोरा ही नाश्त्यामध्येही जास्तीत जास्त हेल्दी खाण्याचा प्रयत्न करताना दिसते. सॅंडविच मलायका अरोरा हिच्या प्लेटमध्ये दिसत होते. मलायका अरोरा ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे.