मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. मलायका अरोराची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सतत मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपची चर्चा ही रंगताना दिसत आहे. मलायका आणि अर्जूनचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले जातंय. मलायका सोशल मीडियावरही सक्रिय दिसतंय. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. विदेशात बिकिनीमध्ये खास फोटोशूटही मलायका हिने केले. तिने फोटोशूटचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. जबरदस्त अशा लूकमध्ये मलायका दिसली होती. मलायका ही कायमच आपल्या फिटनेसकडे लक्ष देतानाही दिसते.
आता मलायका अरोरा ही नुकताच मुंबईमध्ये स्पॉट झालीये. यावेळी ती जबरदस्त लूकमध्ये दिसली. विशेष म्हणजे मलायकाचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडताना दिसतोय. मलायका अरोरा ही एका रेस्टोरेंट बाहेर स्पॉट झालीये. मलायका अरोरा कॅज्युअल आउटफिटमध्ये दिसली.
काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाची बॅगी फिट जीन्समध्ये मलायका दिसली. यासोबतच मलायका अरोरा हिने खास मेकअप केल्याचे देखील बघायला मिळतंय. मलायका ही फोटोसाठीही पोझ देताना दिसत आहे. मलायका अरोरा हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडताना दिसतोय.
गाडीमध्ये बसण्याच्या अगोदर पापाराझींना हॅलो करतानाही मलायका अरोरा दिसली. काही दिवसांपूर्वी अनिल कपूर यांनी मोठा खुलासा केला. अनिल कपूर यांनी म्हटले होते की, आता कपूर खानदानामध्ये सर्वात अगोदर अर्जुन कपूर याचे लग्न होणार आहे. अनिल कपूर यांच्या या विधानानंतर विविध चर्चा रंगताना दिसल्या.
अर्जुन कपूर हा नेमके लग्न कोणासोबत करणार हा प्रश्न विचारला जात होता. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यामध्ये लग्नाच्या विषयावरूनच वाद झाल्याचे सांगितले जातंय. यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले गेले. मात्र, ब्रेकअपच्या चर्चांवर दोघांपैकी कोणीही भाष्य केले नाही. मात्र, तशा काही पोस्टही सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या.