Remo D’Souza: झगमगत्या विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय कोरिओग्राफर रेमो डिसोझा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. फसवणूकी प्रकरणी रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसोझा याच्यासह त्याची पत्नी , फेम प्रोडक्शन कंपनी यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वसई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी व्हि अनबिटेबल डान्स ग्रुप यांची 11 कोटी 96 लाख 10 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
डान्स ग्रुपची फसवणूक केल्याप्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती. पण त्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने डान्सग्रुपने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने पोलिसांना तपास करून चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, पोलीस आयुक्तांच्या आदेशाने गुन्हे शाखा वसई युनिटचे पोलीस निरीक्षक यांनी तपास करून अहवाल सादर केला. त्यानंतर मीरारोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या रेमो डिसोझा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
रेमो डिसोझा याच्यासह त्याची पत्नी लिझेल डिझोझा, ओमप्रकाश चौव्हाण, रोहित जाधव, फेम प्रॉडक्शन कंपनी, रमेश गुप्ता यांच्यासह एका पोलीस कर्मचार्याच्या विरोधात मीरारोड पोलीस ठाण्यात फसवणूक केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास केला. याप्रकरणी गुन्हे शाखा वसई शाखेचे वरिष्ठ पोलीस प्रमोद बडाख हे अधिक तपास करत आहेत.