Malaika Arora | मलायका अरोरा हिचा ‘हा’ लूक पाहून उडेल नक्कीच झोप, अभिनेत्रीचा जबरदस्त लूक

| Updated on: Sep 14, 2023 | 4:23 PM

मलायका अरोरा हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे. मलायका अरोरा तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती सक्रिय असते.

Malaika Arora | मलायका अरोरा हिचा हा लूक पाहून उडेल नक्कीच झोप, अभिनेत्रीचा जबरदस्त लूक
Follow us on

मुंबई : मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच एक चर्चा प्रचंड रंगली अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा (Malaika Arora) यांच्या ब्रेकअपची. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करतंय. अर्जुन कपूर आणि मलायका कायमच स्पाॅट होतात. इतकेच नाही तर चक्क एक पुरस्कार सोहळ्यामध्ये अर्जुन कपूर (Arjun Kapoor) मलायका अरोरा हिची वेनी ओढताना देखील दिसला. काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे विदेशात धमाल करताना दिसले.

अर्जुन कपूर याच्यापेक्षा मलायका अरोरा वयाने मोठी असल्याने बऱ्याच लोकांना यांची जोडी अजिबातच आवडत नाही. अर्जुन कपूर हा नेहमीच मलायका अरोरा हिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. अर्जुन याने मलायका अरोरा हिचा विमानामधील एक खास फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तिचा जबरदस्त लूक दिसला.

नुकताच मलायका अरोरा ही एक पुरस्कार सोहळ्यात पोहचली. यावेळी मलायका अरोरा हिचा जबरदस्त असा लूक दिसला. मलायका अरोरा हिच्या लूककडे पुरस्कार सोहळ्यातील लोकांच्या नजरा दिसल्या. मलायका अरोरा हिने पांढऱ्या रंगाची जबरदस्त अशी साडी घातली. खास मेकअप आणि ज्वेलरी देखील या लूकसोबत तिने कॅरी केली.

मलायका अरोरा हिने या लूकमधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. मलायका अरोरा हिने शेअर केलेल्या या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसतंय. मलायका अरोरा हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडला असून या फोटोवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. अत्यंत बोल्ड मलायका अरोरा दिसतंय. चाहते या फोटोंवर फिदा झाले. मलायका अरोरा ही काही दिवसांपूर्वीच शाहरूख खान याचा जवान हा चित्रपट पाहण्यासाठी पोहचली.

विशेष म्हणजे मलायका अरोरा हिने जवान हा चित्रपट बघितल्यानंतर सोशल मीडियावर एक खास पोस्ट देखील शेअर केली. या पोस्टमध्ये मलायका अरोरा हिने म्हटले की, एकमात्र किंग. यासोबत अर्जुन कपूर यानेही एक व्हिडीओ शेअर करत शाहरूख खानचे काैतुक केले. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे एकसोबतच जवान चित्रपट पाहण्यासाठी पोहचले. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये पावसात फिरताना मलायका आणि अझून दिसले.