मुंबई | 10 जानेवारी 2024 : सिगारेटचं व्यसन, त्रासलेलं आयुष्य आणि ‘ते’ 3 महिने बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या जीवनातील प्रचंड कठीण दिवस होतं. खुद्द अभिनेत्री आयुष्यातील वाईट दिवसांबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री कोंकणा सेन आहे. कोंकणा हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलेल्या कोंकणा हिने तिच्या आयुष्यातील कठीण दिवसांबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे. सध्या सर्वत्र कोंकणा हिची चर्चा रंगली आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कोंकणा हिने तिला लागलेल्या वाईट सवयीबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘मला स्मोकिंगची वाईट सवय आहे आणि आता मला ही सवय मोडायची आहे. मी जास्त स्मोक करत नाही. पण मला पूर्णपणे माझी स्मोकिंगची सवय मोडायची आहे…’
पुढे कोंकणा हिला, ‘तुझ्या आयुष्यात असा कोणता चॅप्टर आहे… ज्याला तुला विसरायचं आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या आयुष्यात एक असा टप्पा आला होता, जेव्हा मी 3 महिने बेड रेस्टवर होती. मला माझ्या आयुष्यातील ते तीन महिने मिटवायचे आहेत. कारण ते दिवस माझ्यासाठी प्रचंड कठीण होते.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली…
कोंकणा हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘वेक अप सिड’ सिनेमामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. आता कोंकणा लवकरच ‘किलर सूप’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा नेटफ्लिक्स प्रदर्शित होणार. सिनेमात कोंकणा हिच्यासोबत अभिनेते मनोज बाजपेयी देखील मुख्य भूमिकेत दिसरणार आहेत.
कोंकणा सेन फक्त अभिनय क्षेत्रात नाही तर, सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अभिनेत्री तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल महत्त्वाच्या अपडेट सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
सोशल मीडियावर कोंकणा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. सध्या कोंकणा ‘किलर सूप’ सिनेमामुळे चर्चेत आहे.