‘त्याने माझा हात पकडला आणि…’, प्रसिद्ध अभिनेत्रीकडून मुनव्वर फारूकी याच्यावर गंभीर आरोप

| Updated on: Oct 30, 2023 | 12:23 PM

'मुनव्वर फारूकी सजावण्यासाठी पण त्याने माझा हात पकडला आणि...', त्याने असं केलं तरी काय, ज्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीने स्टँडअप कॉमेडियनवर केले गंभीर आरोप... अभिनेत्रीच्या आरोपांनंतर वादाच्या भोवऱ्यात अडकणार मुनव्वर फारूकी? सर्वत्र चर्चांना उधाण...

त्याने माझा हात पकडला आणि..., प्रसिद्ध अभिनेत्रीकडून मुनव्वर फारूकी याच्यावर गंभीर आरोप
Follow us on

मुंबई : 30 ऑक्टोबर 2023 : स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकी याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. सध्या मुनव्वर फारूकी ‘बिग बॉस १७’ मध्ये स्पर्धक म्हणून खेळत आहे. दरम्यान, एका प्रसिद्ध अभिनेत्रीने मुनव्वर फारूकी याच्या गंभीर आरोप केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुनव्वर फारूकी याची चर्चा रंगताना दिसत आहे. मुनव्वर फारूकी याच्यावर ज्या अभिनेत्रीने गंभीर आरोप केले आहेत, ती दुसरी तिसरी कोणी नसून सोनिया बंसल (Sonia Bansal) आहे. सोनिया आता बिग बॉसमधून बाहेर आली आहे.

‘बिग बॉस १७’ च्या घरातून बाहेर जाणारी सोनिया बंसल पहिली स्पर्धक आहे. शोमधून बाहेर आल्यानंतर अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे. मुनव्वर फारूकी याने मला वाईटप्रकारे स्पर्ष केलं.. असा आरोप सोनिया हिने केला आहे. ज्यामुळे सोनिया आणि मुनव्वर फारूकी चर्चेत आले आहेत.

नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘मुनव्वर फारूकी याच्यासोबत माझं जास्त बोलणं व्हायचं नाही. एक दिवस मुनव्वर फारूकी मला समजवण्यासाठी आला आणि त्याने माझा हात पकडला. त्याला माझा हात पकडण्याचा काहीही गरज नव्हती…’ असं म्हणत अभिनेत्रीने मुनव्वर फारूकी याला लांब राहण्यासाठी सांगितलं.. सध्या सर्वत्र सोनिया हिच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

हे सुद्धा वाचा

मुनव्वर फारूकी याचा वापर करते मन्नारा चोप्रा?

‘बिग बॉस’ मध्ये मन्नारा चोप्रा आणि मुनव्वर फारूकी यांच्यामध्ये घट्ट नातं असल्याचं दिसत आहे. पहिल्याच दिवशी दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पण दोघांच्या मैत्रीवर देखील सोनिया हिने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. सोनिया म्हणाली, ‘मन्नारा प्रत्येक गोष्ट फार विचार करुन करते. ती मुनव्वर फारूकी याचा वापर करत आहे….’

बिग बॉसबद्दल काय म्हणाली सोनिया बंसल?

‘बिग बॉसच्या घरात तुम्ही शांत बसाल तर, तुम्हाला कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून दिलं जाईल… कारण घरच तसं आहे. तुम्हाला तुमची बाजू मांडावीच लागेल… बिग बॉस फार कठीण आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली…