Love Life | बॉलीवूड मध्ये आशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नाआधी आई होण्याचा निर्णय घेतला. लग्नाआधी गरोदर राहिल्यामुळे अभिनेत्रींना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागला. बॉलीवूडमध्ये अशा देखील काही अभिनेत्री आहेत ज्यांनी प्रेग्नेंसीमध्ये, तर काहींनी आई झाल्यानंतर लग्न केलं. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे कोंकणा सेन शर्मा. कोंकणा हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चहात्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्रीच्या चहात्यांची संख्या देखील फार मोठी आहे. कोंकणा हिला प्रोफेशनल आयुष्यामध्ये यश मिळालं पण अभिनेत्रीचं खाजगी आयुष्य मात्र प्रचंड खडतर होतं.
आज देखील अभिनेत्री बॉलीवूडमध्ये सक्रिय असली तरी देखील तिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात. सध्या अभिनेत्री ‘किलर सूप’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री नव्या सीरिजमुळे चर्चेत असल्यामुळे अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याच्या देखील सर्वत्र चर्चा रंगल्या आहे. प्रेग्नेंट राहिल्यानंतर अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत संसार थाटला. पण अभिनेत्रीचं लग्न फीर काळ टिकलं नाही.
कोंकणा हिने 2007 मध्ये रणवीर शौरी नावाच्या व्यक्तीला डेट करायला सुरुवात केली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर देखील दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही. डेट करत असतानाच 2010 मध्ये कोंकणा प्रेग्नेंट राहिली. अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा देखील तुफान रंगू लागल्या. त्यामुळे सप्टेंबर 2010 मध्ये कोंकणा आणि रणवीर यांनी लग्न केलं.
लग्नानंतर मार्च 2011 मध्ये कोंकणा हिने एका मुलाला जन्म दिला. अभिनेत्रीच्या मुलाचं नाव हारून असं आहे. बाळाला जन्म देण्याआधी अभिनेत्रीने लग्न तर केलं पण कोंकणा हीच लग्न फार काळ काही टिकलं नाही. लग्नानंतर दहा वर्षे देखील कोंकणा तिच्या पतीसोबत एकत्र राहिली नाही. नात्यात सतत येत असलेल्या अडचणींमुळे अभिनेत्रीने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
अखेर 2020 मध्ये कोंकणा आणि रणवीर यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार घटस्फोटाच्या पूर्वीपासूनच दोघांनी विभक्त राहण्यास सुरुवात केली होती. जवळपास पाच वर्ष कोंकणा पतीपासून विभक्त राहत होती. आज कोंकणा तिच्या खासगी आयुष्यात प्रचंड आनंदी आहे. अभिनेत्री तिच्या मुलासोबत राहत आहे.
कोंकणा हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. कोंकणा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. कोंकणा चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कोंकणा हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे.