मुंबई | 5 नोव्हेंबर 2023 | बॉलीवूड मध्ये आपलं स्वतःचं स्थान भक्कम करावं अशी प्रत्येक अभिनेता अभिनेत्रीची इच्छा असते. त्यासाठी कलाकार प्रयत्न देखील करतात. पण सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. कुटुंब बॉलिवूडमध्ये असलं तरी, काही स्टारकिड्स एका हिट सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. पण प्रत्येक स्टारकिडला बॉलिवूडमध्ये यश मिळेलं असं नसतं. असंच काही बॉलिवूडच्या एका अभिनेत्री सोबत देखील झालं आहे. ही बॉलीवूड दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी आहे. अभिनेत्री अथिया शेट्टी हिने 2015 मध्ये ‘हिरो’ या सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
सिनेमात तिच्यासोबत अभिनेता सुरज पंचोली याने मुख्य भूमिका साकारली होती. अभिनेता सलमान खान यांनी अथिया हिला बॉलीवूडमध्ये संधी दिली. ‘हिरो’ हा सिनेमा खुद्द सलमान खान यांनी निर्मित केला होता. पण अथिया शेट्टी चाहात्यांचं मनोरंजन करण्यास अपयशी ठरलीस सिनेमा बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फेल ठरला.
अथिया शेट्टी हीचा ‘हिरो’ सिनेमा फ्लॉप ठरल्यानंतर अभिनेत्री दोन वर्षानंतर ‘मुबारका’ या सिनेमाच्या माध्यमातून चहात्यांच्या भेटीसाठी आली. पण अभिनेत्रीचा दुसरा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर फेल ठरला. त्यानंतर 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोतीचूर चक्राचूर’ या सिनेमात देखील अथिया शेट्टी हिने महत्त्वाची भूमिका साकारली.
दुसरा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर देखील अभिनेत्रीच्या वाट्याला अपयश आली. त्यानंतर अथिया हिने ‘नवाबजादे’ सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावली. एकापाठोपाठ एक चार सिनेमे फ्लॉप गेल्यानंतर अभिनेत्री आता आगामी सिनेमासाठी तयारी करत आहे. अथिया लवकरत ‘होप सोलो’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
अथिया तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये अपयश मिळाल्यानंतर अभिनेत्रीने भारतीय क्रिकेटर केएल राहुल याच्यासोबत लग्न केलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अथिया – केएल राहुल यांनी लग्नाचा निर्णय घेतला. सुरुवातील दोघांनी देखील त्यांचं नातं गुपित ठेवलं.
पण थायलंड या ठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घ्यायला गेल्यानंतर अथिया – केएल राहुल यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. फोटो समोर आल्यानंत अथिया आणि केल राहुल एकमेकांना डेट करत असल्याची माहिती समोर आली. आज अथिया तिच्या वैवाहिक आयुष्यामध्ये आनंदी आहे.
अथिया हिचं फिल्मी करिअर फेल झालं तरी अभिनेत्रीकडे गडगंज पैसा आहे. अथिया हिचे वडील सुनिल शेट्टी यांच हॉटेल्स आहेत. त्यांच्या हॉटेल्समध्ये सेलिब्रिटींची वर्दळ असते. एवढंच नाही तर, सुनिल शेट्टी यांची पत्नी देखील गडगंज श्रीमंत आहे. सुनील शेट्टी यांच्या पत्नी इंटेरियर डिझायनर आणि आर्किटेक्चर कंपनीच्या मालकीण आहेत