मुंबई | 12 नोव्हेंबर 2023 : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्याचं कुटुंब इंडस्ट्रीमधील नसलं तरी, अभिनेत्रींनी स्वतःच्या जिद्दीच्या बळावर बॉलिवूडमध्ये भक्कम स्थान निर्माण केलं. करियरच्या सुरुवातील अभिनेत्रींना अनेक चढ – उतारांचा सामना करावा लागला. पण अभिनेत्रींनी कधीही हार मानली नाही. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ. कतरिना कैफ हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. कतरिना कैफ आज बॉलिवूडच्या सर्वात महागड्या आणि श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. कतरिना गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहे. पण अभिनेत्री कधीही शाळेत गेली नाही.
रिपोर्टनुसार, कतरिना कैफ कधीही शाळेत गेली नाही. कतरिना आणि भावंडांना शिकवण्यासाठी एक शिक्षण घरी यायचे… अशी देखील माहिती समोर येत आहे. कतरिना जेव्हा लहान होती, तेव्हाच अभिनेत्रीच्या आई – वडिलांचा घटस्फोट झाला. कतरिना आणि सात भावंडांचा त्यांच्या आईने ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ केला.
सांगायचं झालं तर, कतरिना हिची आई समाजसेवीका असल्यामुळे अनेक देशांमध्ये त्यांना जावं लागायचं. भारतात येण्यापूर्वी कतरिना लंडन याठिकाणी राहत होती. कतरिना हिने तिच्या करियरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. अभिनेत्रीचा मॉडेलींग पासून सुरु झालेल्या प्रवास आज यशाच्या उच्च शिखरावर पोहोचला आहे.
रिपोर्टनुसार, कतरिना कैफ एका सिनेमासाठी तब्बल 15 चे 21 कोटी रुपये मानधन घेते. सिनेमांसोबत अभिनेत्री जाहिरातींच्या माध्यमातून देखील कोट्यवधींची कमाई करते. कतरिना कैफ हिच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीकडे 263 कोटींपेक्षा देखील अधिक संपत्ती आहे.
कतरिना हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीला फॉलो करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
नुकताच कतरिना कैफ हिचा ‘टायगर 3’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. अभिनेता सलमान खान सिनेमात मुख्य भूमिकेत दिसत आहे. सिनेमात अभिनेता इमरान हश्मी याने खलनायकाच्या भूमिकेला न्याय दिला आहे. ‘टायगर’ सिनेमाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. आता ‘टायगर 3’ सिनेमाला प्रेक्षक किती प्रेम देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.