Janmashtami 2024: दमदार बॉलिवूड गाण्यांशिवाय दहीहंडीचा जल्लोष वाटेल अपुरा

| Updated on: Aug 27, 2024 | 1:13 PM

Janmashtami 2024: कोणताही सण असला तर बॉलिवूडच्या गाण्यांशिवाय सण पूर्ण होऊच शकत नाही... आज संपूर्ण देशात दहीहंडीचा जल्लोष मोठ्या थाटात साजरा होत आहे... पण बॉलिवूडच्या काही गाण्यांशिवाय दहीहंडी पूर्ण होऊच शकत नाही...

Janmashtami 2024: दमदार बॉलिवूड गाण्यांशिवाय दहीहंडीचा जल्लोष वाटेल अपुरा
Follow us on

Janmashtami 2024: बॉलिवूडमधील अनेक सिनेमांध्ये कृष्ण जन्माष्टमीची उत्कंठा पाहायला मिळावी. एवढंच नाही तर, जन्माष्टमीवर अनेक गाणी रचली देखील गेली आहेत. जी आजही लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. दहीहंडीचा जल्लोष हा बॉलिवूडच्या काही गाण्यांशिवाय अपुरा आहे. सिनेमांध्ये रंगत आणण्यासाठी होळी, दिवाळी, गणपती यांसारख्या सणांचा आनंद चित्रित करण्यात येतो. दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडीच्या दिवशी बॉलिवूडच्या गाण्यांची क्रेझ पाहायला मिळते. तर आज दहीहंडीच्या मुहूर्तावर ऐकूया बॉलिवूडची दमदार गाणी…

मैया यशोदा…- सलमान खान स्टारर ‘हम साथ साथ है’ सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सिनेमातील गाणी आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. सिनेमातील ‘मैया यशोदा’ जन्माष्टमीवर आधारित आहे. गाणं आजही चाहत्यांच्या आवडीचं आहे. सिनेमातील काही सीन आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

गोविंदा आला रे आला..- ‘ब्लफ मास्टर’ सिनेमातील हे गाणं जन्माष्टमी आणि दहीहंडीसाठी प्रसिद्ध आहे. गाण्यात प्रत्येक जण मोठ्या उत्साहाने दहीहंडीचा सण साजरा केला आहे. सिनेमाने चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं होतं.

मच गया शोर सारी नगरी में..- अमिताभ बच्चन स्टारर ‘खुद्दार’ सिनेमातील हे गाणं खास दहीहंडीसाठी रचण्यात आलं आहे. गाण्यात महानायक अमिताभ बच्चन मटकी फोडताना दिसत आहे

चांदी की डाल पर सोने का मोर..- अभिनेता सलमान खान याचं गाणं आजही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. दहीहंडीच्या दिवशी भाईजानच्या गाण्याची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसून येतो. सिनेमात सलमान खान याच्यासोबत अभिनेत्री राणी मुखर्जी दिसली होती. तेव्हा राणी – सलमान यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.

वो किसना है – कृष्ण जन्माष्टमीच्या प्रत्येक कार्यक्रमात हे गाणे तुम्हाला कायम ऐकायला मिळेल. अनेकांनी स्टेटससाठी देखील आज या गाण्याचा वापर केला असेल. विवेक ओबेरॉय आणि ईशा शर्वानी यांच्या सिनेमातील गाणं आजही प्रसिद्ध आहे. अनेकांच्या सोशल मीडिया स्टोरीवर देखील ‘वो किसना है’ गाणं ऐकायला मिळत आहे.