अभिनेता अजय देवगन गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अजय याने पत्नी आणि अभिनेत्री काजोल हिच्यासोबत देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अजय देवगन याच्याबद्दल सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अभिनेत्याचं खरं नाव विशाल वीरू देवगन असं आहे. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्याने स्वतःचं नाव बदललं आणि अजय देवगन असं ठेवलं. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फुल और कांटे’ सिनेमात अजय याला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई देखील केली.
बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अजय आणि कजोल एकमेकांच्या प्रेमात पडले. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अजय आणि काजोल यांनी लग्न केलं. 1999 मध्ये काजोल आणि अजय यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगी नीसा देवगन आणि मुलगा युग देवगन आहे… दोघांच्या लग्नाल 25 वर्ष असून अजय – काजोल कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.
काजल आणि अजय यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी कधीच एकमेकांना प्रपोज केलं नाही. दोघांना एकमेकांचे विचार पटले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला… काजल आणि अजय यांनी ‘इश्क’, ‘प्यार तो होना ही था’, ‘यू मी और हम’ आणि ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ ‘हलचल’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
बॉलिवूडचा ‘सिंघम’ एका सिनेमासाठी जवळपास 60 कोटी रुपये घेता. रिपोर्टनुसार, अजय याची नेटवर्थ 540 कोटी रुपये आहे. अजय आज कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगत आहे. मुंबईत अभिनेत्याचा आलिशान बंगला देखील आहे. ज्यामध्ये अजय त्याच्या कुटुंबसोबत राहातो. अजय याला महागड्या गाड्यांचा देखील शोक आहे. अभिनेत्याच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्या आहेत.
काजोल फक्त सिनेमांच्या माध्यमातून नाही तर, जाहिराती, रिऍलिटी शो, सोशल मीडिया,कार्यक्रमांच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई करते. कोजालचा स्वतःचा एक मेकअप ब्रँड देखील आहे. काजोल एका जाहिरातीसाठी जवळपास 3 कोटी रुपये घेते. स्टेज शोसाठी अभिनेत्री 2 – 3 कोटी रुपये घेते. अभिनेत्रीच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, काजोल हिच्याकडे 250 कोटी रुपयांची संपत्ती आहे. आज काजोल – अजय बॉलिवूडचे पॉव्हर कपल म्हणून ओळखले जातात.