Bappi Lahiri Net Worth: अंगभर सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या रुपामुळे परिचित असलेले ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहरी यांचं निधन 15 फेब्रुवारी 2022 मध्ये झालं. आज बप्पी लहरी यांच जन्मदिवस आहे. . बप्पी लहरी हे भारताला डिस्को संगीताची ओळख करुन देणाऱ्या गायकांपैकी एक मानले जातात. बप्पी लहरी यांनी 1970 -80 च्या दशकाच्या उत्तरार्धात चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी सारख्या अनेक सिनेमांना लोकप्रिय गाणी दिली. अशात त्याच्या निधनानंतर चाहत्यांसह बॉलिवूडला देखील मोठा धक्का बसला. लहरी यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
गाण्याची आवड जपत बप्पी लहरी यांनी कोट्यवधींची माया कमावली. बप्पी लहरी यांना फक्त दागीन्यांचीच नाही तर, महागड्या कारची देखील आवड होती. निधनानंतर बप्पी लहरी कुटुंबासाठी कोट्यवधींची संपत्ती मागे ठेवून गेले आहेत. त्यांच्या संपत्तीचा आकडा थक्क करणारा आहे.
रिपोर्टनुसार, बप्पी लहरी यांची संपत्ती 22 कोटी रुपये आह. एका गाण्यासाठी बप्पी लहरी 8 -10 कोटी रुपये मानधन घायचे. सांगायचं झालं तर, बप्पी लहरी यांची महिन्याला 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई होती. म्हणजे वर्षाला बप्पी लहरी यांची कमाई 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक होती.
बप्पी लहरी मुंबईत आलिशान घरात राहायचे. 2001 मध्ये बप्पी लहरी यांनी मुंबईत आलिशान घर खरेदी केलं होता. त्यांच्या घराची किंमत 3.5 कोटी रुपये आहे. शिवाय बप्पी लहरी यांची फक्त भारतात नाही तर, शहरातील अनेक भागांमध्ये देखील प्रॉपर्टी आहे…
रिपोर्टनुसार, बप्पी लहरी यांच्याकडे महागड्या कारचं कलेक्शन देखील आहे. त्यांच्याकडे 5 गाड्या आहेत ज्यात BMW, Audi सारख्या गाड्या आहेत. याशिवाय त्याच्याकडे टेस्ला एक्स कार देखील होती ज्याची किंमत 55 लाख रुपये होती.
बप्पी लहरी फक्त गाणी गाऊन कमाई करत नव्हते तर, रिॲलिटी टीव्ही शोज जज करून, लाइव्ह परफॉर्मन्स देऊन, संगीत निर्माता बनून आणि अभिनयातूनही ते चांगली कमाई करत असे. आज बप्पी लहरी आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी आजही चाहत्यांच्या आणि कुटुंबियांच्या सोबत आहेत.