मुंबई : 16 सप्टेंबर 2023 | अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही दिवसांपासून ‘जवान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. किंग खान याचा ‘जवान’ सिनेमा यंदाच्या वर्षातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी एक ठरला आहे. ‘पठाण’ सिनेमानंतर ‘जवान’ सिनेमाचा बोलबाला सर्वत्र पाहायला मिळत आहे. सांगायचं झालं तर, शाहरुख खान फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. अभिनेता कायम पत्नी गौरी खान, मुलगा आर्यन आणि अबराम खान, मुलगी सुहाना खान यांच्याबद्दल सांगत असतो. आता देखील शाहरुख एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. शाहरुख याने एका मुलाखती दरम्यान एक भावुक करणारी आठवण सांगितली, अभिनेत्याने सांगितलेली आठवण सांगून तुमच्या डोळ्यात देखील पाणी येईल..
अभिनेता शाहरुख खान आज गडगंज संपत्तीचा मालक आहे. अभिनेत्याकडे जवळपास ६ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती आहे. आज शाहरुख खान याच्याकडे सर्वकाही आहे. पण अभिनेत्याकडे आई-वडील नाहीत. किंग खान यांने फार कमी वयात आई – वडिलांना गमावलं आहे. आजही शाहरुख खान याला कायम आई – वडिलांची आठवण येते.
एका जुन्या मुलाखतीत अभिनेता म्हणाला होता की, ‘वयाच्या २५ व्या वर्षी मी कामाला सुरुवात केली. तेव्हा मला सतत आई – वडिलांची आठवण यायची.. एक दिवस सर्वकाही ठिक होईल असं मला वाटायचं… प्रत्येत क्षणी मला आई – वडिलांची कमतरता भासत राहिली आणि आजही भासते..’ असं किंग खान एका मुलाखतीत म्हणाला होता….
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख याची चर्चा रंगली आहे. शाहरुख खान याने आतापर्यंत अनेक एकापेक्षा एक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आणि किंग खान याने ‘बादशहा’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. आजही किंग खान याने जुने सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहत असतात.
आता अभिनेता ‘जवान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. अशात शनिवार – रविवार असल्यामुळे सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ‘जवान’ सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एवढंच नाही तर, अभिनेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शाहरुख खान कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.