अभिनेते राम कपूर यांनी ड्रामाक्वीन राखी सावंत हिचं कौतुक केलं आहे, तर दुसरीकडे बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. सध्या सर्वत्र राम कदम यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. कोणताही गॉडफादर नसताना राखी सावंत हिने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली… याचं मला कौतुक आहे. पण बॉलिवूडने राखी सावंतचा चुकीचा वापर केला… असं देखील राम कदम म्हणाले. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राम कदम यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत राम कदम म्हणाले, ‘आज संपूर्ण देश राखी सावंत हिला ओळखतो. राखीला कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. राखीचे विचार, वागणुकीचं मी समर्थन करत नाही. कधीकधी राखी अत्यंत वाईट वक्तव्य करते. पण मला तिचं कौतुक वाटतं कारण बॉलिवूडमध्ये गॉडफादर नसताना तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.’
पुढे राम कदम म्हणाले, ‘एका चांगल्या आणि ग्लॅमरस डान्सरचा बॉलिवूडने चुकीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. राखीने अनेक घाणेरड्या परिस्थितींचा सामना केला आहे…’ असं म्हणत राम कपूर यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राखी सावंत हिचं कौतुक केलं आणि बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.
राम कपूर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘बडे अच्छे लगते हैं’ (Bade Achhe Lagte Hain) फेम अभिनेते राम कपूर कायम त्यांच्या खासगी आणि व्यवसायीक आयुष्यामुळे चर्चेत असतात. ज्याप्रमाणे राम कपूर ऑनस्क्रिन रोमान्ससाठी ओळखले जातात. त्यांनी अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.
राखी सावंत हिने देखील अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावली आहे. सोशल मीडियावर राखी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी राखी कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.