70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे स्मरणात राहतील असे खास फोटो, दिग्गजांचा सन्मान

| Updated on: Oct 08, 2024 | 9:10 PM

गेल्या वर्षभरात चित्रपटसृष्टीत दमदार कामगिरी करणाऱ्यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सत्तराव्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचं वर्चस्व पहायला मिळालं. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव करण्यात आला.

1 / 5
70 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा आज (8 ऑक्टोबर) नवी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पार पडला. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांसोबतच ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरित करण्यात आले. गेल्या वर्षभरात चित्रपटसृष्टीत दमदार कामगिरी करणाऱ्यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सत्तराव्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचं वर्चस्व पहायला मिळालं.

2 / 5
'अट्टम: द प्ले' या मल्याळम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर 'कांतारा' या चित्रपटातील अभूतपूर्व कामगिरीसाठी कन्नड अभिनेता ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार 'तिरुचित्रांबलम' या चित्रपटासाठी नित्या मेनन आणि 'कच्छ एक्स्प्रेस'साठी मानसी पारेख यांना विभागून देण्यात आला.

3 / 5
'उंचाई' या चित्रपटासाठी सूरज बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर नीना गुप्ता यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'गुलमोहर' हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला तर या चित्रपटातील दमदार कामगिरीसाठी अभिनेते मनोज वाजपेयी यांना विशेष उल्लेख पुरस्कार मिळाला.

4 / 5
प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनादेखील राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं.

5 / 5
प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरला ब्रह्नास्त्र चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. दरम्यान जानी मास्टर म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध कोरिओग्राफर शेख जानी बाशाचा राष्ट्रीय पुरस्कार रद्द करण्यात आला आहे. सहाय्यक कोरिओग्राफरने त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. यामुळे त्याचा हा पुरस्कार रद्द करण्यात आला आहे. जानी मास्टरला या आरोपांखाली गोव्यातून अटक झाली होती. त्याच्याविरोधात पॉक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. जानी मास्टर हा हिंदी आणि दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. त्याने नुकतीच श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या ‘स्त्री 2’ या चित्रपटातील ‘आई नहीं’ या सुपरहिट गाण्याची कोरिओग्राफी केली होती.