मुंबई : रणवीर सिंहचा ’83’ हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक होता. चित्रपट ख्रिसमसच्या वेळी प्रदर्शित झाला, जी चित्रपटासाठी सर्वात आदर्श रिलीज तारीख मानली जाते. रिलीजनंतर चित्रपटाची सुरुवात चांगली झाली पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्याच्या कलेक्शनवर परिणाम झाला. पण, या चित्रपटासाठी चांगली बातमी म्हणजे हा चित्रपट जगभरात चांगला व्यवसाय करत आहे. सातव्या दिवशीही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने जगभरात 115 कोटींची कमाई केली आहे.
1983च्या वर्ल्ड कपवर आधारित या चित्रपटाकडून सगळ्यांना खूप आशा होत्या. पण, या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे व्यवसाय केला नाही, या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर सुमारे 66.66 कोटींचा व्यवसाय केला आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते, चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये अनुक्रमे 12.64 कोटी, 16.95 कोटी आणि 17.41 कोटींची कमाई केली. ही कमाई हळूहळू वाढत गेली. या चित्रपटाच्या भारतीय कमाईचा आकडा 100 कोटींच्या जवळपास जाणे कठीण आहे.
#83TheFilm remains on the lower side overall, but is steady at select metros… Fri 12.64 cr, Sat 16.95 cr, Sun 17.41 cr, Mon 7.29 cr, Tue 6.70 cr, Wed 5.67 cr. Total: ₹ 66.66 cr. #India biz. NOTE: Excluding #Delhi. pic.twitter.com/Vy8qF3e1wf
— taran adarsh (@taran_adarsh) December 30, 2021
#83TheFilm WW Box Office
Decent HOLD on weekdays
Day 1 – ₹ 25.16 cr
Day 2 – ₹ 29.41 cr
Day 3 – ₹ 29.64 cr
Day 4 – ₹ 11.29 cr
Day 5 – ₹ 10.53 cr
Day 6 – ₹ 9.14 cr
Total – ₹ 115.17 cr#RanveerSingh #DeepikaPadukone #83TheMovie— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 30, 2021
व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांच्या मते, रणवीरच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी 25.16 कोटी, दुसऱ्या दिवशी 29.41 कोटी, वर्ल्डवाईड वीकडेजमध्ये तिसर्या दिवशी 29.64 कोटी कमावले. यासह, एका आठवड्यात एकूण 115.17 कोटींची कमाई करून मोठा आकडा गाठला आहे. कोरोनामुळे या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाला आहे. यासोबतच दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा’ आणि ‘स्पायडरमॅन’लाही तगडी स्पर्धा मिळाली आहे.
या चित्रपटाच्या संपूर्ण प्रमोशनदरम्यान, मोठे खेळाडू आणि अभिनेते या चित्रपटाशी जोडले गेले होते. या चित्रपटात अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत, ज्यांनी 1983 च्या विश्वचषकात सहभागी झालेल्या खेळाडूंची भूमिका साकारली आहे. रणवीर सिंग, हार्डी संधू, ताहिर भसीन, एमी विर्क, साकिब सलीम, चिराग पाटील, धैर्य करवा, जतिन सरना हे प्रमुख आहेत. याशिवाय पंकज त्रिपाठी आणि बोमन इराणी हे देखील या चित्रपटात आहेत. यामध्ये दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. ती कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपली आहे. हा चित्रपट 24 डिसेंबर 2021 रोजी हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.