83 : दिग्दर्शक कबीर खाननं केला खुलासा; म्हणाला, चित्रपट पाहताना रडत होती दीपिका पदुकोण

| Updated on: Dec 19, 2021 | 8:48 PM

दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट '83' लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. निर्माते कबीर खान (Kabir Khan) यांनी दीपिकाविषयी एक खुलासा केलाय.

83 : दिग्दर्शक कबीर खाननं केला खुलासा; म्हणाला, चित्रपट पाहताना रडत होती दीपिका पदुकोण
रणवीर, दीपिका आणि कबीर
Follow us on

मुंबई : दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ’83’ लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं जातंय. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचे चाहतेही या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहतायत.

कपील देव यांनी केली स्तुती
या चित्रपटाचा ट्रेलर येताच लोकांनी लाइक्सचा वर्षाव केला होता. रणवीर सिंग हुबेहुब माजी क्रिकेटपटू कपिल देव(Kapil Dev)सारखा दिसतो. कपिल देव यांनाही त्याच्या अॅक्टिंगबद्दल खात्री होती. सोशल मीडिया(Social Media)वरही ते याबद्दल बोलत होते.

मुलाखतीत केला खुलासा
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग त्यांचा आगामी चित्रपट ’83’च्या रिलीजसाठी तयारी करत आहेत. एका मुलाखतीदरम्यान चित्रपट निर्माते कबीर खान (Kabir Khan) यांनी खुलासा केलाय. जेव्हा दीपिकानं हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला तेव्हा ती भावुक झाली आणि आपल्याला कॉल केला, असं त्यांनी सांगितलं.

‘मला वाटलं चुकून डायल केला’
कबीरनं सांगितलं, की दीपिकानं कॉल केला होता. पण आवाज येत नव्हता. मला वाटलं तिनं चुकून डायल केलाय. मी ‘दीपिका, हॅलो’ म्हणत होतो आणि तिकडून आवाज येत नव्हता. तिला बोलता येत नव्हतं, ती भावुक झाली होती.

‘तुला आणखी बोलण्याची गरज नाही’
कबीर खान पुढे म्हणाला, की मला माफ करा, मी खूप इमोशनल झालेय, मला बोलता येत नाहीय, असं दीपिका म्हणाली. त्यावर मी म्हटलं, दीपिका, तुला आणखी काही बोलण्याची गरज नाही. या एका वाक्यावरून मला लक्षात आलंय, सिनेमा कसा आहे ते.

हिंदीसह इतरही भाषांत होणार रिलीज
रणवीर आणि दीपिकाचा ’83’ हा चित्रपट 24 डिसेंबरला हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या भव्य प्रीमियरपूर्वी, 83चा ट्रेलर दुबईतल्या बुर्ज खलिफामध्ये दाखवण्यात आला. त्यावेळी रणवीरसह कबीर खान, त्याची पत्नी मिनी माथूर, दीपिका आणि कपिल देव हजर होते.

कपमध्ये घडलेल्या घटनांवर आधारित सिनेमा
चित्रपटात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारतोय. तर दीपिका पदुकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी भाटियांची भूमिका साकारतेय. 1983च्या वर्ल्ड कपमध्ये घडलेल्या घटनांभोवती हा सिनेमा फिरतो.

Oo Antava : समंतानं रिजेक्ट केलं होतं गाणं, कुणी आणि कशी काढली तिची समजूत?

रुपाली पाटील म्हणतात, राष्ट्रवादीत प्रवेशाला जाताना ईडी कार्यालयात नेतात काय असं वाटलं!

Spider-Man : No Way Home | स्पायडरमॅनची भरारी..! बॉक्स ऑफिसवर ओलांडला 300 मिलियन डॉलरचा टप्पा..!