मुंबई : रणवीर सिंगचे (Ranveer Singh) चाहते त्याच्या ’83’ चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता परंतु कोरोना महामारीमुळे तो पुढे ढकलण्यात आला. 83 हा भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांचा बायोपिक आहे. आता महाराष्ट्रातील सिनेमागृहे उघडण्याबरोबरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची माहितीही देण्यात आली आहे.
22 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात चित्रपटगृहे सुरू होणार आहेत. यासह अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आज रणवीरने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे आणि सांगितले आहे की 83 नाताळच्या निमित्ताने रिलीज होईल.
रणवीरने शेअर केली पोस्ट
टीमसोबत एक फोटो शेअर करत रणवीर सिंगनं लिहिलं – क्रिकेट आणि वर्ल्ड कपची वेळ आली आहे. नाताळच्या दिवशी 83 चित्रपटगृहांमध्ये येत आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज होईल.
पाहा खास पोस्ट
दीपिका देखील दिसणार एकत्र
या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे दीपिका आणि रणवीर पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. रणवीर सिंग कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे तर दीपिका त्यांची पत्नी रोमीच्या भूमिकेत दिसणार आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजला हरवून विश्वचषक जिंकल्याची कथा चित्रपटात दाखवली जाईल. या चित्रपटाद्वारे प्रेक्षक पुन्हा एकदा इतिहासात घडलेले क्षण पुन्हा अनुभवतील.
जूनमध्ये होणार होता रिलीज
कबीर खान दिग्दर्शित 83 हा चित्रपट गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे पुढे ढकलण्यात आला होता. हा चित्रपट जून 2021 मध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण नंतर लॉकडाऊनमुळे निर्मात्यांना पुन्हा ही तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता शेवटी हा चित्रपट ख्रिसमसच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे.
83 मधील रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण व्यतिरिक्त पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना, एमी विर्क यांच्यासह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या
Akshay Kumar : अक्षय कुमारचा फोटो बघून चिडले आयपीएस अधिकारी, म्हणाले- ‘असं होत नाही सर …’