मुंबई : चंकी पांडेची लेक आणि बाॅलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे हिचा लाईगर हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामुळे अनन्या सतत चर्चेत होती. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही अनन्या पांडे दिसली. लाईगर चित्रपटानंतर अनन्या आपल्या फिसमध्ये मोठी वाढ करणार असल्याचे तिच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले. मात्र, लाईगर चित्रपट (Movie) फ्लाॅप गेला. लाईगर चित्रपटाच्या अपयशाचे खापर हे अनन्या हिच्यावरच फोडण्यात आले. लाईगरमध्ये अनन्या पांडे हिच्यासोबत साऊथ स्टार विजय देवरकोंडा हा मुख्य भूमिकेत होता.
लाईगर चित्रपटानंतर अनन्या पांडे हिला अनेक चित्रपटांच्या आॅफर आल्या. मात्र, लाईगर चित्रपट फ्लाॅप गेला आणि निर्मात्यांनी अनन्या पांडे हिच्याकडे पाठ फिरवली. चित्रपट जरी फ्लाॅप गेला असला तरीही अनन्या पांडे ही प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटामुळे नव्हे तर अनन्या पांडे ही तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा सुरू आहे की, अनन्या पांडे ही बाॅलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर याला डेट करत आहे. विशेष म्हणजे अनेकदा हे सोबत स्पाॅट होतात. अनेक पार्ट्यांमध्येही ही सोबत हजेरी लावतात. करण जोहर याच्या शोमध्ये सहभागी झाल्यापासून यांच्या डेटिंगच्या चर्चा आहेत.
काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे हिच्या आईने अनन्या सिंगल असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अनेकांना वाटले की, या फक्त अफवाच आहेत. मात्र, परत एकदा अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी अत्यंत रोमंटिक होत यांनी एक फोटोशूट केले. विशेष म्हणजे या दोघांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली.
आदित्य राॅय कपूर याने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आणि त्याच्यासोबत एक फोटोही शेअर केला आणि लिहिले की, सुन रहा है ना तू…त्यावर अनन्या पांडे हिने लिहिले की, हां हां…फक्त एक दिवस शिल्लक आहे. ही पोस्ट शेअर करताना आदित्यने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, काउंटडाउन चालू आहे…आम्ही उत्साहाने भरलेले आहोत आणि तुमच्या सर्वांसोबत बातमी शेअर करण्याची प्रतीक्षा करू शकत नाही…ते काय असू शकते याची कल्पना आहे?
आता आदित्य रॉय कपूर याची ही पोस्ट तूफान व्हायरल होत असून अनेकांनी थेट यांचा साखरपुडा असल्याचे म्हटले आहे. एक चर्चा सातत्याने रंगत आहे की, याच महिन्यात आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे साखरपुडा करणार आहेत. मात्र, यावर अजूनही आदित्य रॉय कपूर, अनन्या पांडे किंवा चंकी पांडे यांनी काहीही भाष्य केले नाहीये.