मुंबई : काही दिवसांपूर्वीच बाॅलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने जीवे मारण्याची थेट धमकी दिली. सलमान खान याला जीवे मारण्याची लॉरेन्स बिश्नोई याने धमकी दिल्यानंतर सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली. लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याच्या धमकीनंतर सलमान खान याला जीवे मारणार असल्याचा एक ईमेलही पाठवण्यात आला. सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने त्याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलीये. आता सलमान खान याला पाठवण्यात आलेल्या ईमेल संदर्भात मोठा खुलासा झालाय.
सलमान खान याचा जीवे मारण्याचा एक ईमेल आल्यानंतर त्याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलीये. तसेच सलमान खान याला आलेल्या ईमेल प्रकरणात पोलिस तपास करण्यास सुरूवात केली. आता यामध्ये पोलिसांना महत्वपूर्ण माहिती हाती लागल्याचे कळत आहे. यामुळे आता मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलिसांनी सुरू केलाय.
सलमान खान याला UK मधून हा धमकीचा ईमेल पाठवण्यात आलाय. UK च्या एका फोनवरून हा ईमेल सलमान खान याला पाठवण्यात आलाय. ज्या मोबाईलवरून सलमान खान याला ईमेल पाठवण्यात आलाय. तो नंबर शोधण्याचे काम पोलिस करत आहेत. आता UK मधून सलमान खान याला नेमकी कोणी जीवे मारण्याची धमकी दिली याची चर्चा रंगताना दिसत आहे.
सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज यंदा रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील काही गाणेही रिलीज झाले आहेत. यामुळे सलमान खान चर्चेत होता. मात्र, सलमान खान याला लॉरेन्स बिश्नोई याने जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर अभिनेत्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे.
सिद्धू मूसेवाला याच्या हत्येमध्ये लॉरेन्स बिश्नोई याचे नाव पुढे आले. आता सिद्धू मूसेवाला याच्यानंतर लॉरेन्स बिश्नोई याच्या निशाण्यावर सलमान खान हा आहे. यामुळे आता सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलीये. गेल्या काही दिवसांपासून सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर त्याच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा पारा आहे. पोलिसांच्या दोन गाड्या सलमान खान याच्या घराबाहेर तैनात करण्यात आल्या आहेत. लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खान याला माफी मागण्यास सांगितले होते. सलमान खान याने माफी मागितली नसल्याने त्याला परिणाम भोगावे लागणार असल्याचे लॉरेन्स बिश्नोई याने म्हटले आहे.