मुंबई : प्रभासचा आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड संताप होता. आता या चित्रपटाचे नवे पोस्टर खास हनुमान जयंतीनिमित्त रिलीज करण्यात आले आहे. प्रभास, चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांनी सकाळी चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांसाठी शेअर केले. हे पोस्टर शेअर करताना राम के भक्त और रामकथा के प्राण जय पवनपुत्र हनुमान असे कॅप्शनही देण्यात आले. रामभक्तीमध्ये लीन असलेल्या पवनपुत्र हनुमानाचा हा पोस्टर आहे. काहींना हे पोस्टर आवडले आहे. मात्र, दुसरीकडे नेटकऱ्यांना हे पोस्टर अजिबातच आवडले नसल्याचे दिसत आहे.
अनेकांनी कमेंट करत टिका केलीये. नव्या पोस्टवर कमेंट करत एका युजर्सने लिहिले की, हनुमान जी दिसत नाहीत हे तर मौलवी दिसत आहेत. दुसऱ्याने लिहिले की, मोठी दाढी आणि बिना मिशांचे हनुमान जी? मजाक उडवला जातोय. तिसऱ्याने लिहिले की, खरोखर सांगायचे झाले तर हे खूप जास्त खराब वाटत आहे. अजून एकाने कमेंट करत म्हटले, हे मुगल वाटत आहे.
ओम राऊत यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत आदिपुरुष चित्रपटाचे टिझर असो किंवा पोस्टर असो प्रत्येकवेळी ते रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय. आदिपुरुष चित्रपटामध्ये प्रभास हा राम, सैफ अली खान हा रावणाच्या भूमिकेत आणि क्रिती सनॉन ही सीतेची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगताना दिसत आहेत की, प्रभास आणि क्रिती सनॉन हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे दोघे एकमेंकांना डेट करत असल्याचे सांगितले जातंय. आदिपुरुष चित्रपटाच्या सेटवरची यांची लव्ह स्टोरी सुरू झाल्याची चर्चा आहे. करण जोहर याच्या शोमध्ये ज्यावेळी क्रिती सनॉन ही पोहचली होती, त्यावेळी यावर मोठा खुलासा देखील झाला.
काही दिवसांपूर्वी विदेशी सेन्सॉर बोर्डाचे सदस्य उमेर संधू यांनी प्रभास आणि क्रितीच्या साखरपुड्याबाबत एक ट्विट केले होते. ज्यानंतर यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले. या ट्विटवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसले होते. मात्र, अजूनही क्रिती सनॉन आणि प्रभास यांनी त्यांच्या नात्यावर काहीच भाष्य केले नाहीये. चाहते या दोघांनासोबत पाहून प्रचंड इच्छुक आहेत.