मुंबई : शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर तूफान कामगिरी करताना दिसत आहे. चित्रपटाला रिलीज होऊन तेरा दिवस झाले आहेत. या चित्रपटाने (Movie) बाॅक्स आॅफिसवर ताबडतोब कमाई नक्कीच केलीये. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना मोठ्या प्रमाणात दिसत होते. अक्षय कुमार, आमिर खान अशा मोठ्या स्टारचे चित्रपट फ्लाॅप गेल्याने काही दिवसांपासून बाॅलिवूडला मोठे नुकसान सहन करण्याची वेळ आली. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. इतकेच नाही तर या चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. चित्रपटाने ओपनिंग डेलाच धमाकेदार कामगिरी केलीये. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठया वादाला तोंड फुटले होते. बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने मोठा वाद सुरू होता. शाहरुख खान याचे फक्त भारतामध्येच चाहते नसून विदेशातही शाहरुख खानच्या चाहत्यांची संख्या जास्त आहे.
शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाला फक्त देशामध्येच नाही तर विदेशामधूनही मोठा प्रतिसाद मिळतोय. पठाण चित्रपटाने विदेशामधून ओपनिंग डेला तब्बल १०० कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले.
पठाण चित्रपटाला विदेशातही मोठा प्रतिसाद मिळतोय. शाहरुख खान याचे चाहते फक्त भारतामध्ये नाही तर विदेशात देखील आहेत. सोशल मीडियावर सध्या एका चिनी लहान मुलाचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये हा लहान मुलगा शाहरुख खान याच्या गाण्यावर जबरदस्त डान्स करत डुमके देताना दिसतोय. शाहरुख खान याच्या आंखे खुली हो बंद या गाण्यावर जबरदस्त डान्स करतोय.
मोहब्बते या चित्रपटामधील हे गाणे आहे. विशेष म्हणजे अगदी हटके पध्दतीने हा चिनी मुलगा डान्स करताना दिसत आहे. युजर्स या मुलाचा डान्स पाहून त्याचे फॅन झाले असून या व्हिडीओला मोठ्या प्रमाणाच लाईक केले जात आहे.
सोशल मीडियावर यूजर्सची मने या लहान मुलाने जिंकली आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होताना दिसत आहे. युजर्स या व्हिडीओवर कमेंट करत शेअरही करत आहेत.
या मुलाच्या डान्स व्हिडीओवरून कळते की, शाहरुख खान याचे चाहते त्याला किती जास्त लाईक करतात. शाहरुख खान याचा मोहब्बते हा चित्रपट २००० मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाला रिलीज होऊन आता तब्बल २३ होऊन गेले आहेत.