बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) यांचा आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) सध्या वादात सापडला आहे. हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’चा हिंदी रिमेक असलेल्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाविरोधात सोशल मीडियावर नेटकरी कमेंट करत आहेत, त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. आमिर खानने 2015 मध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. या वादावर आता आमिरने प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिर त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याच्या विषयावर व्यक्त झाला. बोलले आहे. एका प्रश्नादरम्यान आमिर म्हणाला, “लोकांना वाटतं की या देशाबद्दल माझ्या मनात प्रेम नाही. पण तसं अजिबात नाही. मला वाईट वाटतं की लोक माझ्या चित्रपटावर बहिष्कार घालत आहेत. कृपया असं करू नका. थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पहा”
2015 मध्ये असहिष्णुतेवर केलेल्या वक्तव्यामुळे आमिर खानच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात आली होती. लाल सिंग चड्ढा या चित्रपटाद्वारे आमिर तब्बल चार वर्षांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. अशा परिस्थितीत ट्विटरवर त्याचं जुनं वक्तव्य पुन्हा शेअर करत काही लोक त्याच्यावर निशाणा साधत आहेत. ज्यामध्ये तो म्हणाला होता की, “भारत हा देश खूप सहिष्णू आहे, पण काही लोक इखं असहिष्णुता पसरवण्याचं काम करत आहेत.” त्याच्या या जुन्या विधानामुळे सोशल मीडियावर ट्रोलर्स त्याला देशद्रोही म्हणत आहेत.
Support only those who support you.#JusticeForKanhaiyaLal#BoycottLaalSinghChaddha pic.twitter.com/jKzR8M1AgG
— Kreately.in (@KreatelyMedia) July 1, 2022
आमिर खान आणि करीना कपूर यांचा आगामी चित्रपट लाल सिंह चड्ढा हा 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाबाबतच्या या गदारोळाचा चित्रपटावर किती परिणाम होतो, हे प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. लाल सिंग चड्ढा या चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूर यांच्याशिवाय मोना सिंग, नाग चैतन्य यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.