मुंबई : लाल सिंह चड्ढा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेल्यानंतर आमिर खान (Aamir Khan) हा चित्रपटांपासून दूर गेला आहे. काही दिवसांपूर्वी आमिर खान याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये पांढरी दाढी, पांढरे केस आणि थकलेला चेहरा आमिर खान याचा पाहून चाहते चिंतेमध्ये आले होते. इतकेच नाही तर बाॅलिवूडच्या कोणत्याही पार्टीला आमिर खान हजेरी लावत नाहीये. लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर आमिर खान खूप जास्त निराश झाल्याचे सांगण्यात येत होते. आमिर खान याला लाल सिंह चड्ढा या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. विशेष म्हणजे चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ देखील बघायला मिळत होती. प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाकडे चाहत्यांनी पाठ फिरवली आणि चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. सुरूवातीपासूनच लाल सिंह चड्ढा या चित्रपटाच्या विरोधात लोकांचा मोठा रोष बघायला मिळत होता. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मोहिम सोशल मीडियावर सुरू होती.
लाल सिंह चड्ढा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर आमिर खान याने मोठा ब्रेक घेतलाय. ११ आॅगस्ट २०२२ ला लाल सिंह चड्ढा हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाची ओपनिंगही अपेक्षेप्रमाणे झाली नाही. या चित्रपटाच्या विरोधात लोकांचा रोष बघायला मिळाला.
लाल सिंह चड्ढा चित्रपट फ्लाॅप झाल्यानंतर आमिर खान याने ब्रेक घेतला असून तो अजूनही अभिनयापासून दूर आहे. काही दिवसांपूर्वी आमिर खान याने सांगितले होते की, आता पुढील काही वर्ष मी माझ्या कुटुंबियांना वेळ देणार आहे.
शक्यतो कोणत्याही कार्यक्रमांमध्ये आमिर खान हा हजेरी लावत नाही. मात्र, नुकताच पार पडलेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आमिर खान याने हजेरी लावली होती. यावेळी आमिर खानला त्याने अभिनयापासून घेतलेल्या ब्रेकबद्दल विचारण्यात आले होते.
यावेळी बोलताना आमिर खान म्हणाला की, माझ्या जवळचे लोकही सध्या माझी मजाक उडवत आहेत. ते म्हणतात की, तू नेहमीच ब्रेकवर आहेस, असेही तू कुठे चित्रपट करतो. मी एक अभिनेता म्हणून ज्यावेळी चित्रपट करतो. त्यावेळी मी माझ्या पात्रामध्ये स्वत: ला पुर्ण प्रकारे झोकून देतो.
लाल सिंह चड्ढा या चित्रपटानंतर लगेचच मी चॅम्पियन्स या चित्रपटाची शूटिंग सुरू करणार होतो. मात्र, मी गेल्या ३५ वर्षांपासून सतत काम करत आहे. यामुळे मी माझ्या कुटुंबियांना अजिबात वेळ देऊ शकलो नाहीये. हा एक प्रकारचा त्यांच्यावर अन्यायच आहे.
पुढे आमिर खान म्हणाला, यामुळेच मी लाल सिंह चड्ढा या चित्रपटानंतर ब्रेक घेत कुटुंबियांना वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटातील आपले पात्र साकारण्याच्या नादामध्ये मी माझ्या कुटुंबियांकडे कधीच लक्ष दिले नाहीये. यामुळे मी माझे मुले, आई आणि कुटुंबियांना वेळ देतोय.