मुंबई : लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर आमिर खान हा बाॅलिवूड (Bollywood) चित्रपटांपासूनच नाही तर पूर्ण बाॅलिवूड इंडस्ट्रीपासूनच दूर गेला आहे. आमिर खान हा कोणत्याच कार्यक्रमांमध्येही सहभागी होत नाहीये. लाल सिंह चड्ढा या चित्रपटाकडून आमिर खान याला प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, प्रत्यक्षात लाल सिंह चड्ढा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेलाय. लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटाचे टीझर रिलीज झाल्यापासूनच सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू होती. मात्र, याकडे आमिर खान याच्यासह चित्रपटाच्या टीमने दुर्लक्ष केले आणि याचाच तोटा लाल सिंह चड्ढा या चित्रपटाला झाला. या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवरून बजेट काढणे देखील अवघड झाले आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला. लाल सिंह चड्ढा या चित्रपटामध्ये आमिर खान याच्यासोबत करीना कपूर ही मुख्य भूमिकेत होती. भारतीय सैनिकांचा या चित्रपटामधून अपमान केल्याचा अनेकांनी आरोप केला होता.
काही दिवसांपूर्वी आमिर खान याचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये आमिर खान याची पांढरी दाढी, पांढरे केस आणि थकलेला चेहरा पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आमिर खान याचे हे फोटो पाहून त्याचे चाहते चिंतेमध्ये आले.
काही दिवसांपूर्वीच आमिर खान याने सांगितले होते की, सतत चित्रपटांमध्ये काम करत असल्याने गेल्या काही वर्षांपासून मी माझ्या कुटुंबियांना अजिबात वेळ देऊन शकलो नाहीये. यामुळे पुढील काही वर्ष मी फक्त आणि फक्त माझ्या कुटुंबियांना वेळ देणार आहे.
आमिर खान आणि सलमान खान यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सलमान खान आणि आमिर खान याची आई आणि काही नातेवाईक दिसत होते. या फोटोमधील विशेष बाब म्हणजे आमिर खान हा फोटो क्लिक करत होता.
आमिर खान आणि सलमान खान याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. आमिर खान आणि सलमान खान हे एका चित्रपटामध्ये सोबत काम करणार आहेत. विशेष म्हणजे आमिर खान हा गेल्या सहा महिन्यांपासून या चित्रपटावर काम करत होता.
या खास चित्रपटासाठी आमिर खान याने सलमान खान याला आॅफर दिल्याचे सांगितले जात आहे. आमिर खान याच्या या चित्रपटामध्ये सलमान खान हा मुख्य भूमिकेत असणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये सलमान खान याने देखील रूची दाखवली आहे.
२००० मध्ये आलेल्या चॅम्पियन या चित्रपटाचा रिमेक बनवण्याचा निर्णय आमिर खान याने घेतला असून हा चित्रपट आमिर खान प्रॅाडक्शनच्या खाली तयार होणार आहे. चित्रपटाच्या स्क्रिप्टवर डायरेक्टर आरएस प्रसन्ना हे काम करत आहेत.
विशेष बाब म्हणजे आमिर खान हा या चित्रपटाला प्रोड्यूस करणार आहे. आमिर खान याने अभिनयामधून थोडासा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला असून तो चॅम्पियन या चित्रपटामध्ये प्रोड्यूसच्या भूमिकेत आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान हा मुख्य भूमिकेत असणार आहे.