मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किसी का भाई किसी की जान चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय. सलमान खान याच्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सलमान खान याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. सलमान खान याच्या या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे सलमान खान याचा हा चित्रपट बिग बजेटचा चित्रपट आहे. शाहरूख खान याच्या पठाणनंतर सर्वाधिक कमाई करणारा किसी का भाई किसी की जान हाच चित्रपट (Movie) ठरणार असल्याची चर्चा आहे.
सलमान खान हाच नाही तर चित्रपटाची संपूर्ण टिम ही चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सलमान खान हा कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहचला होता. यावेळी कपिल शर्मा याच्यासोबत धमाल करताना सलमान खान दिसला. कपिल शर्मा याच्या शोमध्ये अनेक मोठे खुलासे सलमान खान करत होता.
फक्त शोमध्येच जाऊन नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सलमान खान हा चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. नुकताच सलमान खान याने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सलमान खान याने ही पोस्ट शेअर करताना लिहिले की, कामापेक्षा दुसरे काहीच महत्वाचे नाही. त्यामुळे शांत राहू नका. काम करत राहा. चार दिवसांनंतर किसी का भाई किसी की जान
मेहनत नाही घेतली तर फॅमिलीसाठी फॅमिली चित्रपट कसा तयार करणार. अॅडव्हान्स सुरू आहे, खरेदी करून बंद करा. आता सलमान खान याची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सलमान खान याच्या या पोस्टवर आता छोटा भाईजान अर्थात अब्दू रोजिक याने कमेंट केलीये. अब्दू रोजिक याने सलमान खान याला खुश करण्यासाठी एक कमेंट केलीये.
सलमान खान याच्या या पोस्टवर कमेंट करत अब्दू रोजिक याने लिहिले की, मी या चित्रपटासाठी संपूर्ण थिएटर बुक करत आहे, कोण येणार आहे माझ्यासोबत बघायला?…अब्दू रोजिक हा सलमान खान याच्या आगामी चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत असणार असल्याची चर्चा रंगत आहे. अब्दू रोजिक त्याच्या आणि एमसी स्टॅन यांच्या वादामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.