मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याचा आज 46 वा वाढदिवस (Abhishek bachchan Birthday) आहे. आज त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आपल्या 20 वर्षांच्या करिअरमध्ये अभिषेकने अनेक उत्कृष्ट चित्रपट सिनेजगताला दिले. आपल्या वाढदिवशी त्याने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत एक आनंदाची बातमी दिली आहे. त्याचा आगामी चित्रपट घूमरच्या (Ghumar) शूटिंगला सुरूवात झाल्याचं त्याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. हे आपल्या वाढदिवसाचं सर्वात चांगलं गिफ्ट असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
अभिषेकची इन्स्टाग्राम पोस्ट
अभिषेक बच्चन आज त्याचा 46 वा वाढदिवस साजरा करतोय. या आनंदाच्या दिवशी त्याने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. त्याचा आगामी चित्रपट घूमरच्या शूटिंगला सुरूवात झाली असल्याची माहिती त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवरून दिली आहे. इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत त्याने लिहिलंय, “माझ्यासाठी याहून चांगलं बर्थडे गिफ्ट काय असणार… आजचा या आनंदाचा दिवस मी माझ्या नव्या घूमर या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये घालवला.”
अभिषेक बच्चन आणि आर. बाल्की दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. याआधी या दोघांनी ‘पा’ हा सुपरहिट चित्रपट दिला. या चित्रपटात अमिताभ बच्चनदेखील होते. यानंतर आता पुन्हा एकदा आर. बाल्की ‘घूमर’मध्ये अभिषेकसोबत काम करत आहेत.
अभिषेक बच्चनचा ‘दसवीं’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाले आहे. तुषार जलोटा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये अभिषेकसोबत निम्रत कौर या सिनेमात असेल. अभिषेक लवकरच एक तामिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये काम करत असल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या