मुंबई : नाटू-नाटू या गाण्याला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे. मुळात तर आरआरआर चित्रपट हीट ठरलाय. एसएस राजामौली यांचा हा चित्रपट सुपरहिट ठरलाय. 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामध्ये 2023 मधील सर्वोत्कृष्ट -मूळ गाण्याचा पुरस्कार नाटू-नाटू या गाण्याने जिंकून एक नवा इतिहास रचला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर सर्वच स्तरातून आरआरआर चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चित्रपटाच्या टीमचे काैतुक केले आहे. ट्विट करत नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे निर्माते आणि दिग्दर्शकांना देखील टॅग करण्यात आले आहे.
गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाल्यानंतर ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांनी खास एक मुलाखत दिली आहे. यावेळी रामचरण याने सांगितले की, चित्रपटाचे नाटू नाटू गाणे करताना आमचे गुडघे डळमळणे होते.
मुलाखती वेळी विचारण्यात आले की, या गाण्याच्या शूटिंगवेळी सर्वात जास्त मार कोणाला लागला होता. यावर रामचरण याने सांगितले, अजूनही या गाण्याचे नाव काढले की, माझे गुडघे डळमळायला लागतात.
नाटू-नाटू या गाण्याची शूटिंग तब्बल ६५ दिवस सुरू होती. सर्वात शेवटी या गाण्याचे शूटिंग शेड्यूल ठेवण्यात आले होते. या गाण्यासाठी संपूर्ण टीमनेच प्रचंड मेहनत घेल्याचे रामचरण यांनी सांगितले.
नाटू-नाटू हे गाणे कालभैरव आणि राहुल यांनी गायले आहे. अभिनेता शाहरुख खान याने देखील आरआरआर चित्रपटाच्या टीमचे काैतुक करत सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
कोरोनानंतर बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करू शकत नाहीयेत. मात्र, प्रेक्षकांचे साऊथच्या चित्रपटाला प्रेम मिळत आहे. बाॅक्स आॅफिसवर साऊथचे चित्रपट धमाल करताना दिसत आहेत.