मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है… सतिश कौशिक यांच्या निधनाने अनुपम खेर भावूक

| Updated on: Mar 09, 2023 | 8:25 AM

मृत्यू हे या जगाचं अंतिम सत्य आहे. हे मला माहीत आहे. पण माझ्या हयातीत माझा अत्यंत जवळचा मित्र सतीश कौशिक बाबत मी ही गोष्ट लिहील याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता.

मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है... सतिश कौशिक यांच्या निधनाने अनुपम खेर भावूक
Satish Kaushik
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : पप्पू पेजर, कँलेंडर अशा व्यक्तिरेखांमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथाकार सतिश कौशिक यांचं आज पहाटे निधन झालं. वयाच्या 66व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतिश कौशिक यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. मात्र, कौशिक यांच्या जाण्याचं सर्वाधिक दु:ख त्यांचे जिवलग मित्र अभिनेते अनुपम खेर यांना झालं आहे. खेर यांनी ट्विट करून आपल्या जिगरी दोस्तला श्रद्धांजली वाहिली आहे. मृत्यू दुनियेचं अंतिम सत्य आहे. पण सतिश शिवाय आयुष्य पूर्वी सारखं राहणार नाही, असं अनुपम खेर यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

अनुपम खेर यांनी ट्विट करून सतिश कौशिक यांच्या निधनाची बातमी दिली. तसेच आपल्या मित्राबद्दलची भावनाही व्यक्त केली. मृत्यू हे या जगाचं अंतिम सत्य आहे. हे मला माहीत आहे. पण माझ्या हयातीत माझा अत्यंत जवळचा मित्र सतीश कौशिक बाबत मी ही गोष्ट लिहील याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. आमच्या 45 वर्षाच्या मैत्रीला अचानक असा पूर्णविराम लागला आहे. हरी ओम शांती. आता सतिश शिवाय आयुष्य पुन्हा पूर्वी सारखं राहणार नाही, असं अनुपम खेर म्हणाले.

 

16 तासांपूर्वी वाढदिवसाच्या शुभेच्छा

विशेष म्हणजे 7 मार्च रोजी अनुपम खेर यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने म्हणजे 16 तास आधीच सतिश कौशिक यांनी अनुपम खेर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी त्यांनी अनुपम खेर यांनी आपल्याला कसं स्विमिंग शिकवलं याची माहिती कौशिक यांनी या ट्विटमध्ये दिली होती. मात्र, 16 तासानंतर शुभेच्छा देणारे आपल्यात राहणार नाहीत, यावर कुणाचाही विश्वास बसत नाहीये.

मृत्यूच्या कारणांची माहिती नाही

दरम्यान, सतिश कौशिक यांच्या मृत्यूच्या कारणाची माहिती समोर आलेली नाही. कौशिक आजारी नव्हते. तरीही त्यांनी अचानक या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लढवण्यात येत आहे. त्यांनी हृदयविकाराचा झटका आला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.

कंगनाकडून शोक व्यक्त

अभिनेत्री कंगना राणावत हिने सतिश कौशिक यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ही भयानक बातमी वाचतच मी उठले. माझ्यासाठी ते सर्वात मोठे चीअरलीडर होते. ते एक अत्यंत यशस्वी अभिनेते आणि दिग्दर्शक होते. याशिवाय ते दयाळू आणि सच्चे इन्सानही होते. त्यांची नेहमीच कमतरता भासेल, असं कंगनाने म्हटलं आहे.

 

ते माझे मेंटॉर होते

अभिनेता अनिरुद्ध दवे यांनीही सोशल मीडियावरून दु:ख व्यक्त केलं आहे. आज माझा मेंटॉर आणि मुंबईतील माझी स्पोर्ट सिस्टिम राहिली नाही. सतिश कौशिक माझ्यासाठी वडिलांसमान होते. मला त्यांची सतत आठवण येत राहील, असं अनिरुद्धने म्हटलं आहे.