मुंबई : अभिनेता शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेल्या जर्सी या चित्रपटाचे प्रदर्शन लांबवणीवर पडले आहे. येत्या 31 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र हा चित्रपट आता 31 डिसेंबर रोजी प्रेक्षकाच्या भेटीला येणार नाही. विशेष म्हणजे चित्रपटाचे प्रदर्शन का लांबवण्यात आले, याबद्दल निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मागील अनेक महिन्यांपासून शाहिद कपूरचे चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. मात्र आता हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
जर्सी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तरीख पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून हा चित्रपट ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत बोलताना ही माहिती खोटी असून जर्सी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार नसल्याचंदेखील आदर्श यांनी सांगिलंय.
#Xclusiv… #BreakingNews… #Jersey POSTPONED… WON’T RELEASE ON 31 DEC… New date will be announced shortly… Industry talk that #Jersey will be Direct-to-OTT release is FALSE. pic.twitter.com/1MBwsSdWCC
— taran adarsh (@taran_adarsh) December 28, 2021
जर्सीचे प्रदर्शन पुढे ढकलल्यानंतर हा चित्रपट पडद्यावर नेमका कधी झळकणार असा प्रश्न विचारला जातोय. मात्र याबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. सध्यातरी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याबाबत अस्पष्टता आहे. मिळालेल्या माहितीनुसार आणखी काही महिने प्रेक्षकांना वाट पाहावी लागू शकते.
इतर बातम्या :