मुंबई : आपले नाव बदनाम करण्याच्या उद्देशाने काही लोक आपल्याविरोधात काम करत असल्याचे म्हणत अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आहे. आपण फक्त लोकांच्या मदतीसाठी आपला रात्रंदिवस एक केला आहे, असेही तो म्हणाला. हा खटला सोनू सूदविरोधात दाखल झालेल्या याचिकेशी संबंधित आहे. ज्यात मुंबई हायकोर्टाकडे अपील केले होते की, बाजारात मोठी कमतरता असताना, सोनू सूद आणि आमदार झीशान सिद्दीकी यांना कोरोना प्रतिबंधक औषधे रेमडेसिव्हीरसारखी जीवनरक्षक औषधे कशी मिळाली, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे (Actor Sonu Sood Intervenes In Bombay High Court Case On COVID Drugs Distribution).
या प्रकरणात, हायकोर्टाने 15 दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांकडून तपासणीचे आदेश दिले गेले होते आणि विचारणा केली होती की, या चर्चित व्यक्तींनी ही औषधे कशी घेतली याचा शोध घेण्यात यावा.
सोनू सूद यांना आता या प्रकरणात हायकोर्टाने हस्तक्षेप करावा, अशी इच्छा आहे. कारण, जेव्हा लोकांना ही औषधे कुठेही उपलब्ध नव्हती, अशा वेळी या लोकांनी ही औषधे गरजूंना दिली होती आणि त्यामुळे अनेकांचे जीव वाचले.
सोनू सूद आता असा दावा करत आहे की, जेव्हा लोक त्यांच्याशी सतत संपर्क साधत असत, तेव्हा त्याने ही औषधे देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांना ही औषधे मिळू शकली नाहीत याचे कारण बाजारात मोठी कमतरता होती आणि ही औषध मिळवणे प्रत्येकाला जवळजवळ अशक्य झाले होते.
तथापि, या लोकांना ही औषधे नेमकी कुठून मिळाली, ती कायदेशीर आहेत की नाही किंवा त्यांच्याकडे उत्तेजक औषधे नाहीत, याविषयी उच्च न्यायालयाने तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. औषधाच्या लढाईमध्ये अशी औषधे रुग्णांना दिली गेली नाहीत, ज्यामुळे त्यांचा बळी गेला. सोनूने सांगितले की, त्याने ही औषधे गोरेगाव, मुंबई येथील लाइफलाईन मेडिकेअर हॉस्पिटलमधून घेतली होती, जी सिप्ला नामांकित कंपनीने बनवली होती.
सोनू सूदविरोधात ही याचिका निलेश नवलखा नावाच्या व्यक्तीने दाखल केली आहे. तर, आपले नाव खराब करण्याच्या उद्देशाने अशी याचिका दाखल करण्यात आली असल्याचे सोनूचे म्हणणे आहे. तो आणि त्याची स्वयंसेवी संस्था केवळ लोकांना मदत करण्याच्या स्पष्ट हेतूने कार्य करत आहेत.
याप्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. खुद्द कोर्टानेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असले, तरी अशा परिस्थितीत सोनूला या प्रकरणात कोर्टातून किती दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(Actor Sonu Sood Intervenes In Bombay High Court Case On COVID Drugs Distribution)
Photo : ‘गंदी बात’ फेम आभा पॉलच्या हॉटनेसचा तडका, सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर