मुंबई : अविका गोर हिने अत्यंत कमी वयामध्ये टीव्ही मालिकेपासून आपल्या करिअरची सुरूवात केली. आनंदी नावाने आजही अविका गोर हिला ओळखले जाते. बालिका वधू या मालिकेमधूनच अविकाला खरी ओळख मिळाली. आनंदी नावाने तिला इतकी जास्त ओळख मिळाली की, त्यानंतर तिने इतर टीव्ही मालिकेसोबतच थेट बाॅलिवूड चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. आनंदी म्हणजे अविका आपल्या चाहत्यांसाठी बोल्ड फोटो कायमच शेअर करते. अविकाचा बोल्ड लूक पाहून अनेकांना मोठा धक्काच बसतो.
अविकाने नुकताच एका मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासे केले आहेत. तिच्या आयुष्यामध्ये एक काळ अत्यंत वाईट आला होता. ज्यावेळी तिच्या प्रोफेशन लाईफसोबतच पर्सनल लाईफमध्ये अनेक प्राॅब्लेम सुरू होते. त्यावेळी अविका या समस्यांना अत्यंत खंबीरपणे सामोरे गेली.
एक काळ अविकाच्या आयुष्यात असा आला होती की, ती तासंतास रडत बसायची. अविका म्हणाली की, मला कधीच चांगल्या प्रोजेक्टची चिंता नव्हती. परंतू माझ्या हातामध्ये जे काम होते, त्या कामासाठी मी खूप जास्त मेहनत घेत होते. परंतू मी जेवढी मेहनत घेत होते, तेवढे ते काम अजिबातच दिसत नव्हते. याची मला कायम चिंता असायची.
कारण मला नेहमीच वाटायचे की, मी जे काही मिळवले आहे त्या तुलनेत मला काम मिळत नाहीये. मुळात म्हणजे मी चांगले काम करत होते. परंतू मी माझ्या कामाबद्दल समाधानी नक्कीच नव्हते. मला असे वाटत होते की, मी यापेक्षाही अधिक काही चांगले करू शकते.
पुढे अविका म्हणाली की, जेंव्हा मी माझ्या आयुष्यामध्ये थोडे मागे वळून जेंव्हा बघते. तेंव्हा मला असे वाटते की, मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत ज्या समस्यांमधून बाहेर आले आहे तर मी माझ्या आयुष्यात काहीही करू शकते. मी माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळामधून जात होते, त्यावेळी मी स्वत:ला एक वेळ रडण्यासाठी देत होते.