‘एवढा मोठा माणूस असं बोलतोय…’, L&T कंपनीच्या चेयरमनच्या 90 तासांच्या वक्तव्यावर दीपिका पदुकोण भडकली

| Updated on: Jan 09, 2025 | 9:14 PM

एल अँड टी कंपनीचे चेअरमन एस. एन. सुब्रह्मण्यन यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्याला किमान 90 तास काम करावा, असं म्हटलं आहे. यावर दीपिका पदुकोण हिने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. सुब्रह्मण्यन यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करणे महत्त्वाचे आहे, असं दीपिकाचं म्हणणं आहे.

एवढा मोठा माणूस असं बोलतोय..., L&T कंपनीच्या चेयरमनच्या 90 तासांच्या वक्तव्यावर दीपिका पदुकोण भडकली
L&T कंपनीच्या चेयरमनच्या 90 तासांच्या वक्तव्यावर दीपिका पदुकोण भडकली
Follow us on

एल अँड टी कंपनीचे चेयरमेन एस. एन. सुब्रह्मण्यन यांनी नुकतंच कर्मचाऱ्यांनी एका आठवड्याला किती तास काम करावे याबाबत एक व्यक्त केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अर्थात त्यांनी तसंच वक्तव्य केलं आहे. कर्मचाऱ्यांनी प्रत्येक आठवड्याला किमान 90 तास काम करावं, असं वक्तव्य सुब्रह्मण्यन यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने देखील नाराजी व्यक्त केली आहे. दीपिका पदुकोण हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.

दीपिका पदुकोण हिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर याबाबत लिहिलं आहे. “एक असा व्यक्ती, जो इतक्या मोठ्या पदावर बसला आहे, त्याचं अशाप्रकारचं वक्तव्य करणं फार हैराण करणार आहे”, अशा शब्दांत दीपिका व्यक्त झाली आहे. दीपिकाने आपल्या पोस्टमध्ये हॅशटॅग देखील वापरले आहेत. #metalhealthmatters असं हॅशटॅग दीपिकाने वापरलं आहे. दीपिका या हॅशटॅगने मेंटल हेल्थ जास्त आवश्यक आहे, असं इच्छित आहे.

एस एन सुब्रह्मण्यन काय म्हणाले?

एस एन सुब्रह्मण्यन यांचं पूर्ण वक्तव्य जाणून घेऊयात. एस एन सुब्रह्मण्यन यांना प्रश्न विचारण्यात आला की, अब्जावधी डॉलरची कंपनी असूनही तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांकडून शनिवारी का काम करुन घेता? त्यावर त्यांनी अजबच उत्तर दिलं. मला या गोष्टीची खंत आहे की, मी आपल्या कर्मचाऱ्यांकडून रविवारी काम करुन घेऊ शकत नाही, असं सुब्रह्मण्यन म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्यावर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

‘रविवारीदेखील काम करायला पाहिजे’

एस एन सुब्रह्मण्यन यांचं म्हणणं आहे की, माझ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी रविवारी सुद्धा काम केलं असतं तर मला आनंद झाला असता. मी स्वत: रविवारच्या दिवशी काम करतो, असं सुब्रह्मण्यन म्हणाले. तसेच कर्मचाऱ्यांनी दर आठवड्याला 90 दिवस तरी काम करायला हवं, असंही ते म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्यामुळे ते सध्या चर्चेत आहेत.

एस एन सुब्रह्मण्यन यांचं म्हणणं आहे की, “लोकांनी रविवारच्या दिवशीदेखील ऑफिसला यायला हवं. घरी राहून काय करणार? पत्नीला कधीपर्यंत घुरत राहणार? “. दरम्यान, इन्फोसिस या आयटी कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांनीदेखील मागे एकदा असंच काहीसं वक्तव्य केलं होतं. तरुणांनी दर आठवड्याला 70 तास तरी काम करावं, असं नारायण मूर्ती म्हणाले आहेत.