मुंबई : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिच्या अडचणींमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ झालीये. सुकेश चंद्रशेखर याच्या 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलीन फर्नांडिस हिचे नाव आल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. इतकेच नाहीतर ईडीकडून या प्रकरणात अनेकदा जॅकलीनची चाैकशी देखील करण्यात आलीये. या प्रकरणात जॅकलीन फर्नांडिस हिची मालमत्ता देखील जप्त करण्यात आली होती. या प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसचे पाय खोलात असल्याचे बोलले जात आहे.
सुकेश चंद्रशेखर याने जॅकलीन फर्नांडिस हिच्या प्रमाणेच अभिनेत्री नोरा फतेही हिला देखील महागडे गिफ्ट दिल्याचे बोलले जात होते. जॅकलीन फर्नांडिस हिच्यासोबतच नोरा फतेहीचे नाव देखील या प्रकरणात सातत्याने येत होते.
काही दिवसांपूर्वीच नोराने मानहानीचा दावा जॅकलीन फर्नांडिसवर दाखल करत, सुकेश चंद्रशेखर आणि माझे काहीच संबंध नसताना नाव सोडले जात असल्याचा आरोप केला होता. आता जॅकलीन फर्नांडिसबद्दल मोठी माहिती पुढे येतंय.
जॅकलीन फर्नांडिस हिने आता विदेशात जाण्याची परवानगी मागणारी याचिका मागे घेतली आहे. जॅकलीन हिने काही दिवसांपूर्वी बहरीनला जाण्याची परवानगी मागितली होती. कारण जॅकलीन हिची आई आजारी असून तिला भेटण्यासाठी तिला बहरीनला जायचे होते.
कोर्टाने जॅकलीन फर्नांडिस हिला विचारले की, तुम्ही बहरीनचा वीजा घेतला आहे का? यावर जॅकलीनचे वकिल म्हणाले की, तो वीजा अगोदरपासूनच घेतलेला आहे. यावर ईडीने सांगितले की, हे प्रकरण महत्वपूर्ण टप्प्यामध्ये आहे.
जॅकलीन फर्नांडिस ही एक विदेशी नागरिक आहे. जर एकदा ही विदेशात गेली आणि परत आली नाहीतर केसमध्ये समस्या निर्माण होऊ शकते. विदेशात जॅकलीन तिचे करिअर तयार करू शकते.
यावर कोर्ट म्हणाले की, आता हे प्रकरण महत्वाच्या टप्प्यामध्ये आहे. आताच जाणे महत्वाचे आहे का? आम्ही तुमचे इमोशन समजू शकतो. आजारी आईला भेटायचे आहे. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ही याचिका मागे घेऊ शकता. कोर्टाचे ऐकत जॅकलीन हिने याचिका मागे घेतली.