मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडते. मात्र, यावेळी कंगना तिच्या एका वेगळ्या पोस्टमुळे चर्चेत आलीये. फार कमी वेळा कंगना ही एखाद्या चित्रपटाचे काैतुक करते. यावेळी कंगना हिने इरफान खान याचा मुलगा बाबिल खान आणि त्याच्या कला या चित्रपटाची तारीफ केलीये. या चित्रपटामधील बाबिलचा अभिनय कंगनाला प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. इतकेच नाही तर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, चित्रपटावरून माझी नजरच हटत नाहीये.
बाबिल खान याचा कला हा चित्रपट नुकताच ओटीटीवर रिलीज झालाय. विशेष म्हणजे हा चित्रपट सर्वांनाच आवडताना दिसत आहे. या चित्रपटामधील बाबिल खान याचा अभिनय पाहून अनेकजण त्याचे काैतुक करताना दिसत आहेत.
कला चित्रपटाची दिग्दर्शक अन्विता दत्तचे काैतुकही कंगना राणावत हिने केले आहे. कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, कला हा चित्रपट अत्यंत चांगला आहे.
कंगनाने पुढे आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, हा चित्रपट तुमची ठराविक तीन कृती रचना नाही किंवा भौतिक जगाची एखादी स्टोरी नाहीये…चित्रपटामधील सर्वच दृश्य ही खूपच चांगली आणि अप्रतिम आहेत.
बाबिल खान एका नव्या कलाकाराच्या भूमिकेत जबरदस्त दिसत आहे. आता कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण कंगना फार कमी वेळा एखाद्या चित्रपटाचे काैतुक करते. कला चित्रपटाची संपूर्ण स्टोरी ही संगीत जगताशी संबंधित आहे.